23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषबीसीसीआय लवकरच नव्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू करणार

बीसीसीआय लवकरच नव्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू करणार

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

भारतीय क्रिकेट पुरुष संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ जूनमध्ये समाप्त होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय लवकरच पुरुष संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू करणार आहे. याविषयी नवा अपडेट समोर आला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, लवकरच ते नव्या प्रशिक्षक पदासाठीचे अर्ज मागवणार आहेत. राहुल द्रविड देखील या भूमिकेसाठी अर्ज करू शकतो आणि परदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती देखील होऊ शकते असं समोर आले आहे.

कोचिंग स्टाफमधील इतर सदस्य जसे की फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांची नियुक्ती नवीन प्रशिक्षकाशी सल्लामसलत केल्यानंतर केली जाईल. राहुल द्रविड याचा करार नोव्हेंबर २०२३ मध्ये वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये २ जूनपासून सुरू होणाऱ्या आगामी टी- २० विश्वचषक २०२४ स्पर्धेपर्यंत वाढवण्यात आला होता. त्यामुळे राहुलचा कार्यकाळ जूनपर्यंत आहे. जर त्याला पुन्हा या पदावर राहण्याची इच्छा असल्याचं त्याला पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. नवीन प्रशिक्षक भारतीय की विदेशी असेल हे आम्ही ठरवू शकत नाही. ते CAC वर अवलंबून असेल आणि आम्ही एक जागतिक संस्था आहोत.

हे ही वाचा:

‘अबब! १५ कोटी रुपयांचे ड्रग्स कॅप्सूल पोटात ठेवून तस्करी करणारा मुंबई विमानतळावर अटक’

‘२,९०० पीडित आहेत कुठे?’

रतलाममधील काँग्रेस उमेदवार म्हणतो, दोन बायका असतील तर देऊ दोन!

लाच म्हणून मागितला मोबाईल फोन; महिला पोलीस अधिकारी जाळ्यात

सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयरबद्दल चर्चा आहे. काही खेळाडूंनी याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली आहे. यावर जय शाह यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “यामुळे अधिक भारतीय खेळाडूंना लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. हा नियम कायमस्वरूपी नसून असा नियम बंद करण्यापूर्वी मंडळ सहभागी सर्व पक्षांशी चर्चा करेल. इम्पॅक्ट प्लेअर ही एक चाचणी केस होती.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा