“मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते.” असे म्हणणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड विरोधात भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी भाजपा कार्यकर्त्यांमार्फत मलबार हिल पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मंगल प्रभात लोढा विलगीकरणात असल्यामुळे त्यांना स्वतः जाऊन तक्रार दाखल करता आली नाही.
Lodged the complaint against Shivsena MLA Sanjay Gaikwad at Malabar Hill Police Station.
Attaching the copy. @LoksattaLive, @abpmajhatv, @zee24taasnews, @TOIMumbai, @dna, @mumbaimirror, @mataonline @PIBHomeAffairs, @MumbaiPolice, @CPMumbaiPolice pic.twitter.com/XZwED8RpU0— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) April 19, 2021
देवेंद्र फडणवीस यांचा खून करण्याची धमकी देणे, इजा पोहोचवणे, जीव घेण्याचा प्रयत्न करणे आणि जनतेत उद्रेक निर्माण करून उपद्रव माजवणे अशा अनेक आरोपांखाली संजय गायकवाड यांच्यावर तक्रार दाखल केली आहे. आयपीसीच्या कलम २६८, २८४, ३०७, ३१९ या कलमांतर्गत तक्रार दाखल केली आहे. मंगलप्रभात लोढा यांनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घेत हस्तक्षेप करावा अशी मागणीही केली आहे.
मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशाराही त्यांनी दिला होता. ते शनिवारी बुलढाण्यात बोलत होते.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारची अकार्यक्षमता झाकण्यासाठी नवाब मलिक यांनी खोटी माहिती दिली
आम्हाला गृहमंत्र्यांना पैसे द्यावे लागतात- पोलीस निरीक्षक
‘या’ सहा राज्यातून येणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य
मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींना पत्रातून काय लिहिले?
“कदाचित रात्रीची उतरली नसेल आणि त्यातच आमदार संजय गायकवाड यांनी ती पत्रकार परिषद घेतली असेल. मला त्यांना एकच विनंती करायची आहे की त्यांनी अशाप्रकारे कोरोनाचे विषाणू माझ्या घशात घालण्याआधी हँड ग्लोव्हज घालावेत आणि नीट मास्क लावावं. कारण मला तर जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला कोरोनाच्या विषाणूने फार काही होईल असं मला वाटत नाही. पण असं म्हणतात की सामान्य माणसांपेक्षा जे तळीराम असतात त्यांना कोरोना लवकर होतो. त्यामुळे त्यांना जर असं करायची इच्छा असेल तर त्यांनी हँड ग्लोव्हज आणि मास्क वापरावा.” असे प्रतिरुत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.