मुंबई शेअर बाजार गुरुवारी धडाधड कोसळला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचिबद्ध केलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सात लाख कोटींनी घटून ३९३.६८ कोटींवर आले. गेल्याच बुधवारी बाजार भांडवल ४००.६९ लाख कोटी रुपये होते. बुधवारी परदेशी गुंतवणूकदारांनी एकूण ६६६९.१० कोटी रुपयांचे भागभांडवल विकले.
गुरुवारीदेखील परदेशी गुंतवणूकदारांनी सहा हजार ९९४ कोटींच्या समभागांची विक्री केली. कामकाजाच्या सहा सत्रांत एफआयआयने एकूण २२ हजार ८५७ कोटींच्या समभागांची विक्री केली. या व्यतिरिक्त काही कंपन्यांच्या कामगिरीचे तिमाहीचे निकाल वाईट आल्यामुळेही शेअर बाजार कोसळला. एकूण ९२९ कंपन्यांचे समभाग वधारले. तर, दोन हजार ९०२ कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. तर, ११२ समभाग कोणत्याही चढ-उताराशिवाय बंद झाले. घसरणीचा सर्वांत जास्त परिणाम एफएमसीजी, मेटल, बांधकाम व्यावसायिक, ऊर्जा, पायाभूत सुविधा, कमोडिटी आणि पीएसई कंपन्यांवर झाला.
घसरणीची पाच मोठी कारणे
- १. निवडणूक निकालाबाबत अनिश्चितता
- २. विदेशी गुंतवणूकदारांची विक्री
- ३. तिमाहीचे वाईट निकाल
- ४. यूएस फेडच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम
- ५. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
हे ही वाचा:
हनी ट्रॅप प्रकरण; ‘सोनल’ बनून आयएसआयने लष्करी ड्रोन डेटा मिळवला
त्या जहाजावरील भारतीय सुटले! इराणने पाच भारतीय खलाशांना सोडले
हिंदू दहशतवादाचे पितृत्व पवारांचेच, ले.कर्नल पुरोहीतांचा गौप्यस्फोट!
‘दाऊद टोळी ड्रग्सच्या धंद्यात अजूनही सक्रिय’
सोन्यावर कर्ज देणाऱ्या कंपन्यांवर दबाव
भारतीय रिझर्व्ह बँकेने २० हजार रुपयांवरील कर्ज रोखीत न देण्याचे निर्देश दिल्यामुळे सोन्यावर कर्ज देणाऱ्या कंपन्या व एनबीएफसीच्या समभागांवर मोठा परिणाम दिसून आला. आरबीआयच्या निर्देशानंतर मण्णपूरम फायनान्स व मुथ्थुट फायनान्स या कंपन्यांच्या समभागात अनुक्रमे ८.३ व ८.८ टक्के घसरण दिसून आली. मुथ्थुट फायनान्सच्या एकूण व्यवहारापैकी ८४ टक्के कर्ज सोन्याशी संबंधित असून मणिप्पूरम फायनान्सचा सोन्यावरील कर्जाचा वाटा एकूण व्यवहाराच्या ५१ टक्के आहे.