22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरदेश दुनियामालदीवची अक्कल ठिकाण्यावर आली; भारतीयांसाठी पायघड्या

मालदीवची अक्कल ठिकाण्यावर आली; भारतीयांसाठी पायघड्या

भारतीय पर्यटकांमध्ये ४२ टक्के घट

Google News Follow

Related

‘आमची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. मे महिन्यात भारतीयांनी मालदीवला भेट द्यावी,’ असे आवाहन मालदीवच्या पर्यटनमंत्र्यांनी केले आहे. २०२३ मधील पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेत सन २०२४ च्या पहिल्या चार महिन्यांत भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत ४२ टक्के घट झाली आहे. त्यामुळे मालदीव सरकारकडून आता भारतीय पर्यटकांना पायघड्या पसरवल्या जात आहेत.

‘कृपया मालदीवच्या पर्यटनाचा एक भाग व्हा. आमची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे,’ मालदीवचे पर्यटन मंत्री इब्राहिम फैसल यांनी अलीकडेच भारतीय पर्यटकांना आवाहन केले आहे. जानेवारीमध्ये दोन्ही देशांमध्ये राजनैतिक वाद सुरू झाल्यापासून भारतातून पर्यटकांच्या आगमनात लक्षणीय घट झाली आहे. सन २०२३ मधील याच कालावधीच्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांमध्ये ४२ टक्के घट झाली आहे.

भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्याचा मालदीव सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मालदीवला भेट देणाऱ्यांमध्ये भारत हा अव्वल स्थानी होता. मात्र, त्याचे स्थान सहाव्या क्रमांकावर घसरले आहे. तसेच, चिनी पर्यटकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. चार महिन्यांपूर्वीची परिस्थिती खूपच वेगळी होती. २०२३ मध्ये मालदीवला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांमध्ये सर्वाधिक भारतीय पर्यटक होते. तर, चीन तिसऱ्या क्रमांकावर होता.

सन २०२३ मध्ये जानेवारी ते एप्रिल दरम्यान मालदीवमध्ये भारतातून ७३ हजार ७८५ पर्यटक आले होते, तर या वर्षी याच कालावधीत ४२ हजार ६३८ पर्यटकांचे आगमन झाले. म्हणजे तब्बल ३१ हजार १४७ पर्यटकांची घट झाली. जानेवारी २०२४ मध्ये १५ हजार सहा भारतीयांनी मालदीवला भेट दिली. फेब्रुवारीमध्ये ११ हजार २५२ भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली, तर गेल्या याच महिन्यात २४ हजार ६३२ पर्यटकांनी मालदीवला भेट दिल होती.

२०२३ मध्ये मार्च महिन्यात एकूण १६ हजार १४१ पर्यटकांच्या तुलनेत या वर्षी मार्चमध्ये केवळ सात हजार ६६८ भारतीयांनी मालदीवला भेट दिली. तसेच, एप्रिलमध्ये आठ हजार ७१२ भारतीयांनी मालदीवला भेट दिली. एप्रिल २०२३ मध्ये ही संख्या १८ हजार ६६२ होती.

पर्यटन महसुलात लक्षणीय घट

भारतातून पर्यटकांच्या आगमनात सातत्याने घट झाल्यामुळे पर्यटन हा सर्वांत मोठा उद्योग असणाऱ्या मालदीवच्या महसुलात लक्षणीय घट झाली आहे. त्यांच्या एकूण ठोकळ राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटनाचा वाटा २८ टक्के आहे. भारतातून मालदीवच्या सात दिवसांच्या सहलीसाठी प्रति व्यक्ती दीड लाख रुपये खर्च येतो. अशाप्रकारे, ३१ हजार १४७ पर्यटक कमी झाल्यामुळे ४६८ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. मालदीवला भेट देणारे भारतीय पर्यटक सहसा प्रति रात्र अडीच हजार ते पाच हजार डॉलर (अंदाजे रु. दोन लाख सात हजार ते चार लाख १४ हजार रुपये) या दरम्यान खर्च करतात म्हणून महसूलातील तोटा अधिक होण्याची शक्यता आहे.

मालदीव न्यूज पोर्टल sun.mv मधील एका अहवालानुसार, घसरणीचा प्रभाव लक्षणीय आहे. पर्यटनाचा हंगाम नसलेल्या काळातही पर्यटन महसूल टिकवून ठेवण्यासाठी भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने हा परिणाम मोठा आहे.
भारतीय आगमनावर अवलंबून असलेल्या ट्रॅव्हल एजन्सी आणि ऑपरेटर्सच्या महसुलातही ८० टक्के घट झाली आहे.
भारतीय पर्यटकांची संख्या घसरत असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्वतः पर्यटन मंत्री फैझल हे भारतात पोहोचले आहेत. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांचा हवाला देत फैझल यांनी ‘आम्ही नेहमीच शांतता आणि मैत्रीपूर्ण वातावरणाला प्रोत्साहन देतो. आमचे नागरिक आणि सरकार भारतीय आगमनाचे मनापासून स्वागत करतील,’ असे म्हटले होते.

हे ही वाचा:

चारधाम यात्रेला दणदणीत प्रतिसाद

खलिस्तानी गुरुपतवंत पन्नू प्रकरणी रशिया भारताच्या पाठीशी

‘पाईपने भरलेल्या ट्रकमध्ये सापडले ८ कोटी’

एअर इंडियाच्या रजेवर गेलेल्या २५ कर्मचाऱ्यांना कायमची ‘रजा’

काही दिवसांपूर्वी, मालदीव असोसिएशन ऑफ ट्रॅव्हल एजंट्स अँड टूर ऑपरेटर्सने मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तांसोबत बैठक घेतली आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी सहयोगी प्रयत्नांबद्दल चर्चा केली. मालदीवला पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी ते प्रमुख भारतीय शहरांमध्ये रोड शो आयोजित करणार आहेत. तसेच, मालदीवचे परराष्ट्र मंत्री मूसा जमीर हे देखील त्यांच्या पहिल्या उच्चस्तरीय मंत्रिस्तरीय भेटीसाठी भारतात येत आहेत. परराष्ट्र मंत्री जमीर गुरुवारी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा