लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि निवडणूक आयोगाचे पथक देशातील सर्व राज्ये आणि भागात सातत्याने तपासणी करत आहेत. तपासणी मोहिमेत गुंतलेले पथक रोख रक्कम व इतर वस्तू जप्त करण्याची मोठी कारवाई करत आहे. या मालिकेत पुन्हा एकदा चेकपोस्टवर मोठी कारवाई करून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे.
हे संपूर्ण प्रकरण आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्याच्या गरिकापाडू चेकपोस्टचे आहे. येथे एनटीआर जिल्हा पोलिसांनी चेक पोस्टवर ८ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पाईपने भरलेल्या लॉरीच्या वेगळ्या केबिनमध्ये हे पैसे सापडले. पोलिसांनी रोख रकमेसह दोघांना ताब्यात घेतले आहे. हे पैसे हैदराबादहून गुंटूरला नेले जात होते. “आम्ही ही रक्कम जिल्हा तपास पथकांना सुपूर्द करू, आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि फ्लाइंग स्क्वॉड टीम पुढील कारवाई करतील,” असे जगगैयापेट सर्कलचे निरीक्षक चंद्र शेखर यांनी सांगितले.
हे ही वाचा:
एअर इंडियाच्या रजेवर गेलेल्या २५ कर्मचाऱ्यांना कायमची ‘रजा’
“पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आला पाहिजे, आम्ही त्यासाठी वचनबद्ध”
करकरे, परमबीर यांनी बॉम्बस्फोट कटाची कबुली देण्यासाठी आणला दबाव!
‘एरिअल फोटोग्राफी करुन राज्य चालवता येत नाही’
दरम्यान, मुंबई पोलिसांनी देखील कारवाई करत मोठी रोकड जप्त केली होती.दोन दिवसांपूर्वी पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान एक कॅश व्हॅन घेऊ जात असताना पोलिसांनी व्हॅनला अडवले आणि चौकशी करत तपासणी केली.तपासणी वेळी पवई पोलिसांना व्हॅनमधून तब्बल ४ कोटी ७० लाख रुपये सापडले होते.