काँग्रेसचे नेते सॅम पित्रोडा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. मागे देशातील संपत्तीच्या वितरणावरून त्यांनी केलेले वक्तव्य वादात सापडले होते आता त्यांनी चक्क भारतीयांची तुलना त्यांच्या रंगावरून करत भारतीयांचा अपमान केला आहे. सॅम पित्रोडा यांनी म्हटले आहे की, पूर्वेकडील भारतीय हे चिनींसारखे दिसतात तर दक्षिणेतील भारतीय हे आफ्रिकेतील वाटतात.
स्टेट्समनला दिलेल्या मुलाखतीत पित्रोडा म्हणाले की, गेली ७५ वर्षे भारतीय हे अत्यंत आनंद वातावरणात राहिलेले आहेत. काही ठिकाणचे संघर्ष सोडले तर लोक एकत्र राहात आहेत. भारतात विविधता आहे. तरीही लोक एकत्र आहे. तिथे पूर्वेतील लोक हे चिनींसारखे दिसतात तर पश्चिमेतील लोक अरबींसारखे. उत्तरेतील लोक हे श्वेतवर्णीय आहेत तर दक्षिणेतील लोक हे आफ्रिकेतील वाटतात.
राहुल गांधी उत्तर द्या!
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वक्तव्यावर कठोर टीका केली आहे. मोदींनी राहुल गांधींना यासाठी लक्ष्य केले आहे. ‘तुम्हाला याचे उत्तर द्यावे लागेल. आपल्या भारतीयांचा अपमान देश सहन करणार नाही. त्यांच्या रंगावरून होणारा अपमान मोदी सहन करणार नाहीत,’ असे मोदी म्हणाले.
पित्रोडा यांनी केलेल्या या वक्तव्यांवर काँग्रेसनेच नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, सॅम पित्रोडा यांनी केलेली ही विधाने दुर्दैवी आहेत आणि स्वीकारार्ह नाहीत. काँग्रेस पक्ष या विधानांशी सहमत नाही.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्वशर्मा म्हणाले की, सॅमभाई मी ईशान्य भारतात राहतो आणि मी भारतीय वाटतो. आम्ही वेगवेगळे दिसत असलो तरी एकच आहोत. आमच्या देशाबद्दल थोडी तरी माहिती घ्या.
हे ही वाचा:
राहुल गांधी आता अंबानी-अदानींबद्दल बोलत नाहीत, त्यांच्याकडून किती माल घेतला?
कर्मचारी अचानक आजारी पडले; एअर इंडियाची ७८ उड्डाणे रद्द
यजुवेंद्र चहलचे ३५०, टी-२० क्रिकेटमधील पहिला भारतीय गोलंदाज
शरियानुसार पेन्शन द्या, इस्रायलशी संबंध तोडा…मुस्लिम गटाच्या ब्रिटनमध्ये मागण्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, पित्रोडा हे जातीयवादी आहेत. त्यांच्या वक्तव्यांवरून त्यांची ही वृत्ती दिसून येते. मी दक्षिण भारतीय आहे पण भारतीय आहे. आमचे सहकारी ईशान्य भारतात आहेत पण तेही भारतीयच आहेत. पण राहुल गांधींच्या मार्गदर्शकांना आम्ही आफ्रिकन, चिनी, अरब आणि श्वेतवर्णीय वाटतो.
काँग्रेसचे प्रवक्ते तेहसीन पूनावाला यांनीही टीका करताना म्हटले आहे की, सॅम पित्रोडा हे नेहमीच आपल्या वक्तव्यांनी काँग्रेसला अडचणीत आणतात. मी तर यावर आता बोलूही शकत नाही. काँग्रेसने पित्रोडा यांना काहीही बोलू नका अशी विनंती करायला हवी आणि त्यांच्यापासून अंतर राखावे. ते आता काँग्रेसला दुखावत आहेत. राम मंदिरावरही त्यांनी बोलण्याची गरज नव्हती.