29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषकर्मचारी अचानक आजारी पडले; एअर इंडियाची ७८ उड्डाणे रद्द

कर्मचारी अचानक आजारी पडले; एअर इंडियाची ७८ उड्डाणे रद्द

एअर इंडियाचे कर्मचारी हे पगाराबाबत नाखूष आहेत.

Google News Follow

Related

एअर इंडियाचे कर्मचारी अचानक आजारी पडल्याने सुमारे ७८ आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून रद्द उड्डाने करण्याबाबत अहवाल मागवण्यात आला आहे. याशिवाय या विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या नियमांनुसार प्रवाशांसाठी सुविधा निश्चित करण्याचा सल्ला दिलं आहे.

एअर इंडियाचे कर्मचारी हे पगाराबाबत नाखूष आहेत. यापूर्वी कर्मचाऱ्याकडून निवेदन देण्यात आले होते. यामध्ये एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या केबिन क्रूचा एक भाग काल रात्रीपासून आजारी असल्याची तक्रार नोंदवली गेली आहे. परिणामी फ्लाइट विलंब आणि रद्द करण्यात आले. यामागील कारणे समजून घेण्यासाठी आम्ही क्रूशी संवाद साधत आहोत. यामुळे होणारी गैरसोय कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या व्यात्ययाबद्दल आपण सर्वांची माफी मागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा..

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव हीच नावे कायम…विरोधातील याचिका फेटाळल्या!

शरद पवारांना कळले आहे, आता पक्ष चालवणे शक्य नाही!

राहुल गांधी आता अंबानी-अदानींबद्दल बोलत नाहीत, त्यांच्याकडून किती माल घेतला?

यजुवेंद्र चहलचे ३५०, टी-२० क्रिकेटमधील पहिला भारतीय गोलंदाज

उड्डाणे रद्द झाल्यामुळे यामुळे गैरसोय झालेल्या अतिथींना पूर्ण परतावा किंवा दुसऱ्या तारखेला विनामूल्य सेवा देण्याची ऑफर दिली जाईल, असे त्यात म्हटले आहे. सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, एअर इंडियाचे सुमारे २०० पेक्षा जास्त केबिन क्रू आजारी असल्याचे समजते. कोची, कालिकत आणि बंगळुरूसह विविध विमानतळांवर उड्डाणात व्यत्यय आल्याची माहिती त्यांनी दिली. बुधवारी दिल्लीत एअर इंडिया एक्स्प्रेसची १६ उड्डाणे रद्द करण्यात आली. केरळमध्ये एअरलाइनने राज्यातील चारही विमानतळांवरून अनेक उड्डाणे रद्द केली.

कोझिकोड विमानतळावर १२ उड्डाणे रद्द झाल्यानंतर गोंधळ उडाला. काही संतप्त प्रवासी विमान कंपनीच्या ग्राउंड स्टाफशी वाद घालत होते, तर काही विमानतळाबाहेर बसलेले दिसले. माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद हे देखील एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइटमध्ये श्रीनगर ते दिल्ली प्रवास करणार होते. मात्र हे उड्डाण रद्द झाल्याने त्यांचाही प्रवास होऊ शकला नाही. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “मला सकाळी निघायचे होते. पण मी इथे ३-४ तास बसून होतो. आता इंडिगोच्या फ्लाइटने निघत आहे. जर फ्लाइट रद्द झाली असेल तर त्यांनी आम्हाला सकाळीच कळवायला हवे होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा