24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषखलिस्तान समर्थक परेडमध्ये ‘हिंसेचा उत्सव’;भारताने कॅनडाला सुनावले!

खलिस्तान समर्थक परेडमध्ये ‘हिंसेचा उत्सव’;भारताने कॅनडाला सुनावले!

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी व्यक्त केली नाराजी

Google News Follow

Related

टोरंटोमधील माल्टन येथे नगर कीर्तन परेडमध्ये खलिस्तान समर्थनार्थ प्रतिमा प्रदर्शित झाल्यानंतर दहशतवादी घटकांना आश्रय देणाऱ्या कॅनडावर भारताने जोरदार टीका केली आहे.परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी निवेदन जाहीर करून कॅनडाच्या या कृतीबद्दल तीव्र नाराजी दर्शवली.

‘कॅनडातील दहशतवादी घटकांकडून आमच्या राजकीय नेतृत्वाविरुद्ध वापरल्या जाणाऱ्या हिंसक प्रतिमांबाबत आम्ही वारंवार आमच्याकडून तीव्र चिंता व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी, आमच्या माजी पंतप्रधानांच्या हत्येचे चित्रण करणारा फ्लोट मिरवणुकीत वापरण्यात आला होता. तसेच, भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना धमकी देणारे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहेत. हिंसेचा उत्सव आणि गौरव करणे हा कोणत्याही सुसंस्कृत समाजाचा भाग असू नये. कायद्याच्या राज्याचा आदर करणाऱ्या लोकशाही देशांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कट्टरपंथी घटकांना धमकावण्याची परवानगी देऊ नये,’ अशा कठोर शब्दांत भारताने कॅनडा सरकारचा निषेध केला.

ओंटारियो गुरुद्वारा समितीने येथे नगर कीर्तन परेडचे आयोजन केले होते. या परेडमध्ये सहभागी झालेले फ्लोट्स आणि भाषणांच्या माध्यमातून भारतीय राजकीय व्यक्तींना आक्रमकपणे लक्ष्य केले गेले. त्यातील एका फ्लोटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोठडीत असल्याचेही चित्रण होते.सहा किलोमीटरच्या या परेडमध्ये दल खालसाचे परमजीत मंड आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादी घोषित केलेले अवतार सिंग पन्नू यांसारख्या व्यक्तींची प्रक्षोभक भाषणे झाली.

हे ही वाचा:

पॅलेस्टाईन समर्थक निदर्शकांनी अमेरिकेचा ध्वज जाळला!

“बाळासाहेबांचे विचार गुंडाळल्यामुळेचं उद्धव ठाकरेंसमोर अल्ला हो अकबर, टिपू सुलतानचे नारे”

‘झारखंडमध्ये ईडीची पुन्हा धाड, १.५ कोटी रुपये जप्त’

बलात्काराच्या गुन्ह्यातला आरोपी दाऊद तब्बल ४० वर्षांनी सापडला आग्र्यात

‘आम्ही कॅनडामधील आमच्या राजनैतिक प्रतिनिधींच्या सुरक्षेबद्दल चिंतित आहोत आणि कॅनडा सरकार त्यांच्या जबाबदाऱ्या न घाबरता पार पाडू शकतील, हे सुनिश्चित करतील, अशी अपेक्षा आहे,’ असे जयस्वाल म्हणाले.‘गुन्हेगार आणि फुटीरतावादी घटकांना कॅनडामध्ये सुरक्षित आश्रयस्थान आणि राजकीय जागा प्रदान करणे थांबवण्याचे आवाहन आम्ही पुन्हा कॅनडा सरकारला करतो आहोत,’ असेही जयस्वाल यांनी नमूद केले.

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंट्सचा संभाव्य सहभाग असल्याचा आरोप गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी केल्यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. तर, भारताने हे आरोप तथ्यहीन म्हणून फेटाळून लावले आहेत.अलीकडे, जस्टिन ट्रूडो, इतर प्रमुख कॅनडाच्या नेत्यांसह टोरंटोमध्ये खालसा दिनाच्या उत्सवात सहभागी झाले होते. ट्रुडो यांनी जमावाला संबोधित करण्यास सुरुवात केल्यावर कार्यक्रमातील व्हिडिओंमध्ये खलिस्तान समर्थक घोषणा दिल्या जात असल्याचे दिसून आले.

भारताने अशा कार्यक्रमात ट्रूडोच्या उपस्थितीबद्दल तीव्र निषेध नोंदविला आणि कॅनडाच्या उपउच्चायुक्तांना बोलावून कॅनडातील अतिरेकी आणि हिंसक विचारसरणींना राजकीय आश्रय दिला जात असल्याबद्दल तीव्र नापसंती आणि चिंता व्यक्त केली.३ मे रोजी, कॅनडाच्या पोलिसांनी करणप्रीत सिंग, कमलप्रीत सिंग आणि करण ब्रार या तीन भारतीयांना अटक केली आणि दावा केला की, ते हरदीप सिंग निज्जरला मारणाऱ्या मारेकऱ्यांशी संबंधित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा