जम्मूकाश्मीर मधील पूंछमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत मोठी माहिती समोर आली आहे.भारतीय सुरक्षा दलाने पूंछमध्ये हल्ला करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले आहे.याशिवाय या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यास २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर शनिवारी(४ मे) दहशतवादी हल्ला झाला होता.या दहशतवादी हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू तर अन्य चार जवान जखमी झाले होते.हवाई दलाचे जवान कॉर्पोरल विकी पहाडे यांना या हल्ल्यात वीरमरण आले.हल्ल्यानंतर सुरक्षा दलांकडून परिसरात मोठी शोध मोहीम राबवली जात आहे.दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सशस्त्र बुलेटप्रूफ वाहने आणि श्वान पथके तैनात करण्यात आली आहेत.
हे ही वाचा:
दिल्लीनंतर आता अहमदाबादच्या शाळांना बॉम्बची धमकी!
‘४ जून ही बीजेडी पक्षाची एक्स्पायरी डेट’
क्रिकेटचा चेंडू प्रायव्हेट पार्टला लागल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू!
“दोन वर्षापूर्वी करेक्ट कार्यक्रम केला; आता फक्त विकास हाच अजेंडा”
दरम्यान, सुरक्षा दलाने दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचे रेखाचित्र सर्वत्र जारी केले आहे.तसेच या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यास २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.अद्याप या दोन दहशतवाद्यांची नावे समोर आलेली नाहीत.सुरक्षा दलाकडून कसून चौकशी आणि परिसरात मोठी शोधमोहीम राबवण्यात येत आहे.