इस्रायल आणि हमास दरम्यानच्या युद्धाला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला असताना इस्रायलने कतारच्या मालकीची वृत्तवाहिनी अल जजीराची स्थानिक कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी सांगितले की, त्यांच्या सरकारने हा निर्णय सर्वानुमते घेतला आहे.
इस्र्यायल आणि हमाससोबत युद्धविरामाशी संबंधित चर्चेने कतारमध्ये वेग पकडला असताना हा निर्णय आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निर्णयाची तातडीने अमलबजावणी केली जाईल. या निर्णयामध्ये अल जजीराची कार्यालये बंद करणे, त्यांची प्रसारण साधने जप्त करणे, चॅनलच्या अहवालाचे प्रसारण रोखणे आणि त्यांची वेबसाइट ब्लॉक करणे आदी निर्णय घेतले जाऊ शकतात.
हे ही वाचा:
लखनऊवर विजय मिळवून कोलकाता अव्वल स्थानी!
‘भाजपला मदत करण्यासाठी हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला’
झारखंडमध्ये मंत्र्याच्या पीएच्या नोकराच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड
‘मला काँग्रेसच्या कार्यालयातील खोलीत बंद केले’
इस्रायलच्या सुरक्षेला नुकसान पोहोचवले
‘अल जजीराच्या पत्रकारांनी इस्रायलच्या सुरक्षेला नुकसान पोहोचवले आणि सैनिकांविरोधात सूडभावनेला खतपाणी खातले. आता आपल्या देशातून हमासच्या मुखपत्राला हद्दपार करण्याची वेळ आली आहे,’ असे नेतन्याहू म्हणाले.
परदेशी वृत्तवाहिन्यांवरही कारवाईची शक्यता
इस्रायल पंतप्रधानांच्या कार्यालयाने हे स्पष्ट केले की, गेल्या महिन्यात संमत झालेल्या कायद्यानुसार, देशाला नुकसान पोहोचवणाऱ्या कोणत्याही परदेशी वाहिनीविरोधात सरकार कारवाई करू शकते. त्यामुळे अन्य परदेशी वाहिन्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. कतारची राजधानी असलेल्या दोहा येथे अल जजीराचे मुख्यालय आहे. तेथून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.