27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियानेपाळ १०० रुपयांच्या नोटांवर छापणार नवा नकाशा; भारताच्या तीन भागांचा समावेश

नेपाळ १०० रुपयांच्या नोटांवर छापणार नवा नकाशा; भारताच्या तीन भागांचा समावेश

नेपाळच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला निर्णय

Google News Follow

Related

नेपाळने शुक्रवारी १०० रुपयांच्या नव्या नोटा नकाशासह छापण्याची घोषणा केली आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. नेपाळ जो नकाशा नोटेवर छापणार आहे त्यामध्ये लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी हे वादग्रस्त भाग दाखवण्यात आले आहेत. भारताने यापूर्वीच या भागांना कृत्रिम विस्तार म्हटले आहे. नेपाळ सरकारच्या प्रवक्त्या रेखा शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, नेपाळचा नवा नकाशा छापण्याचा निर्णय पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० रुपयांच्या नोटांमध्ये लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी यांचा समावेश असलेल्या नेपाळचा नवा नकाशा छापण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सरकारच्या प्रवक्त्या रेखा शर्मा यांनी सांगितले. २५ एप्रिल आणि २ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० रुपयांच्या नोटेची पुनर्रचना करण्यास आणि नोटेच्या पार्श्वभूमीवर छापलेला जुना नकाशा बदलण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

नेपाळच्या संसदेत या वादग्रस्त विधेयकाच्या बाजूने २७५ पैकी २५८ मतं पडली होती. कुठल्याही सदस्याने या बिल विरोधात मतदान केलं नव्हतं. विधेयक मंजूर करण्यासाठी खालच्या सभागृहात दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती. नेपाळी काँग्रेस (NC), राष्ट्रीय जनता पार्टी-नेपाल (RJP-N) आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी (RPP) सह प्रमुख विरोधी पक्षांनी नव्या वादग्रस्त नकाशाच समर्थन केलं होतं.

१८ जून २०२० रोजी नेपाळने तीन सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण क्षेत्रे लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा क्षेत्रांचा समावेश करण्यासाठी आपल्या घटनेत सुधारणा करून देशाचा राजकीय नकाशा अद्यायवत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. ज्यावर भारताने तिखट प्रतिक्रिया दिली आणि याला एकतर्फी कृत्य आणि अस्थिर कृत्य म्हटले होते. भारताने नेपाळच्या प्रादेशिक दाव्याचा कृत्रिम विस्तार असल्याचे घोषित केले होते. लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा यांवर भारताचा हक्क आहे. सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या पाच भारतीय राज्यांसह नेपाळ १ हजर ८५० किमी सामायिक करतो. नेपाळशी लांब सीमा सामायिक करते.

हे ही वाचा:

‘तुम्हाला आधी रायबरेलीतून विजय मिळवावा लागेल’

कॅनडा पोलिसांकडून तीन भारतीयांना अटक

‘रोहित वेमुला दलित नाही’; पोलिसांनी केली मृत्यूच्या तपासाची फाइल बंद

अमित शहा एडिटेड व्हिडीओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई, काँग्रेस नेत्याला अटक!

भारताच्या शेजारी देशांपैकी एक असलेला नेपाळ हा भारताचा जुना मित्र आहे. भारताने नेहमीच नेपाळला साथ दिली आहे. तसेच नेपाळच्या संकटकाळात भारताने नेहमीच मदतीचा हात दिला आहे. मात्र, मागच्या काही वर्षात भारत-नेपाळ संबंधात तणाव निर्माण होईल अशा काही घटना घडल्या आहेत. आता या नोटांवरील नकाशामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशातील संबंध खराब होऊ शकतात, अशी शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा