महाराष्ट्रात शनिवारी ६७ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात जाणवत आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर असताना राजकारण मात्र मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. बुलडाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. संजय गायकवाड यांना भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. नितेश राणे यांनी गायकवाड यांना तो प्रयोग प्रथम मुख्यमंत्र्यांवर कर. अशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलं.
देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले..
हे या गायकवाडला कोण सांगेल..
पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू..
जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर..
कुठे घालायची तिथे घाल..— nitesh rane (@NiteshNRane) April 18, 2021
संजय गायकवाडांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर आरोप करताना त्यांची भाषा घसरली होती. “मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,” असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले. संजय गायकवाड यांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्यांनी “देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांब राहिले. हे या गायकवाडला कोण सांगेल.. पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू, जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, कुठे घालायची तिथे घाल”, अशा शब्दात टीका केली आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना फक्त वसुलीच कळते
दुपारी मंत्री दम देतात, संध्याकाळी अटक होते
लस उत्पादनासाठी संपूर्ण क्षमता वापरा
“मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले. फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशाराही त्यांनी दिला. ते शनिवारी बुलडाण्यात बोलत होते. यावेळी संजय गायकवाड यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. भरसभेत संजय गायकवाड यांची जीभ घसरली होती.