25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमाजी निवडणूक आयुक्तांनी राजदीपची चांगलीच चंपी केली!

माजी निवडणूक आयुक्तांनी राजदीपची चांगलीच चंपी केली!

माजी निवडणूक आयुक्त गोपालस्वामी यांनी घेतली हजेरी

Google News Follow

Related

राजदीप सरदेसाई यांची १ मे रोजी पुन्हा टीव्हीवर नाचक्की झाली. यावेळी कारणीभूत ठरले ते माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी. दोन्ही टप्प्यांच्या निवडणुका पूर्ण होऊनही निवडणूक आयोगाने पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या मतटक्क्यांची माहिती जाहीर न केल्याच्या मुद्द्यावरून ते गोपालस्वामी यांना प्रश्न विचारत होते.

विरोधी पक्षांच्या खांद्यावर बंदुक ठेवून सरदेसाई हा प्रश्न विचारत होते. ११ दिवसांनंतर मतदानाची माहिती बाहेर पडणे, हे चिंताजनक आहे, असे सरदेसाई म्हणत होते. विरोधी पक्ष यावरून प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र गोपालस्वामी म्हणाले की, सरदेसाई यांनी ही माहिती तपासली नाही, याचा अर्थ असा नव्हे की, निवडणूक आयोगाने उशीर केला आहे. ’११ आणि चार दिवसांनंतर डेटा प्रसिद्ध झाला आहे. ही केवळ तुमची कल्पना आहे. दुसऱ्याच दिवशी माहिती मिळते. ही माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. कोणीही ती पाहू शकतो. तुम्ही जर ती पाहू शकत नसाल, तर काही हरकत नाही. ते माहिती जाहीर करूनही बदनाम होत आहेत,’ असे गोपालस्वामी यांनी सरदेसाई यांना सुनावले.

गोपालस्वामी यांनी सरदेसाई यांना अशा फालतू गोष्टी बंद करण्याचा सल्ला दिला आणि अशा प्रकारे विरोधी पक्षांची मदत करण्याचा प्रयत्न बंद करण्याचा सल्ला दिला. मात्र तरीही राजदीप सरदेसाई शांत झाले नाहीत. त्यामुळे गोपालस्वामी यांनी मतदान संपल्यानंतर निवडणूक अधिकारी काम कसे करतात, हे समजावले. ‘प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान संपल्यानंतर फॉर्म १७ सी भरला जातो. त्यामध्ये मतदानाची आकडेवारी लिहिली जाते. त्यावरील प्रतींवर निवडणूक अधिकाऱ्याची स्वाक्षरी असते, जी सर्वांकडे असते. तोपर्यंतच अंदाजे आकडे समोर येतात. त्यानंतर जेव्हा सर्व १७ सी फॉर्म रिटर्निंगजवळ जातात, तेव्हा ते हे गजमा करतात मग सर्व माहिती समोर ठेवली जाते,’असे गोपालस्वामी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी म्हणाले, राहुल गांधी आप ‘डरो मत, भागो मत’

नाशिकमध्ये ठाकरे गट फुटला; विजय करंजकरांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

पॅलिस्टिनी समर्थन आंदोलनात दोन हजारांहून अधिक जणांना अटक!

कोट्यवधींच्या चलनी नोटा घेऊन जाणारे चार कंटेनर आंध्र प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आणि…

याबाबत कोणतीही निष्काळजी केली जात नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती सादर करण्यास ११ दिवस उशीर केला, यावर जोर दिला. त्यावर गोपालस्वामी यांनी समजावले की, अंतिम अधिकृत माहिती डेटा वेबसाइटवर मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यानंतर येते. ३० एप्रिल रोजी जी माहिती आली. ती केवळ संकलन होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे निवडणूक आयोग अतिरिक्त माहिती देत असताना विरोधी पक्ष आणि त्याच्या समर्थनार्थ प्रसारमाध्यमे त्यांच्या चुका काढत असल्याबद्दल त्यांनी टीका केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा