26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाइंदोरमध्ये लव्ह जिहाद; मुलीला अडकवण्यासाठी विवाहित शाहरूख शेख झाला यश जैन

इंदोरमध्ये लव्ह जिहाद; मुलीला अडकवण्यासाठी विवाहित शाहरूख शेख झाला यश जैन

विवाहाच्या आमिषाने अनेकदा बलात्कार

Google News Follow

Related

एका मुस्लिम मुलाने जैन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याची घटना मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये उघडकीस आली आहे. मोहम्मद शाहरूख शेख याने स्वतः यश जैन असल्याचे सांगत या मुलीशी मैत्री केली. तसेच, तिला विवाहाचा प्रस्ताव दिला आणि त्याच्या मावशीच्या घरात तिच्यावर वारंवार बलात्कार केला. जेव्हा तिने माहिती काढली असता तो केवळ मुस्लिमच नाही तर विवाहित असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. या प्रकरणी हिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाव बदलून मैत्री करणे, धार्मिक ओळख लपवणे आणि लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार करणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचा फर्निचरचा व्यवसाय आहे. वर्षभरापूवी विम्याच्या कामासाठी त्या दोघांची भेट झाली होती. त्याने स्वतःची ओळख यश जैन अशी करून दिली होती. त्यानंतर त्या दोघांची मैत्री झाली. एकमेकांशी संभाषण वाढले. त्याने आपण या नात्यामध्ये गंभीर असून तिच्याशी लग्न करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती. तिनेही त्याच्यावर विश्वास ठेवला. ते दोघे त्याच्या मावशीच्या घरी भेटत असत.

हे ही वाचा:

दुबईला पुन्हा मुसळधार पावसाचा फटका

उद्धव ठाकरेंच्या जाहिरातीत पॉर्न स्टारची भूमिका!

अल्पवयीन हिंदू मुलीवर बलात्कार करून केले धर्मांतरण!

भारताच्या पंतप्रधानपदासाठी पाकिस्तानचा पाठिंबा राहुल गांधींना

विवाहाचे ठरवण्यासाठी ते तीन-चारदा येथे भेटले. तेव्हा त्याने तिची लैंगिक पिळवणूक केली. मात्र १५ एप्रिल रोजी तो तिला एके ठिकाणी घेऊन गेला. तो तिच्यापासून काहीतरी लपवत असल्याचे आढळल्यानंतर तिने माहिती काढण्यास सुरुवात केली. तेव्हा तिला धक्कादायक बाब समजली. त्याचे नाव मोहम्मद शाहरूख शेख असल्याचे तिला समजले. नंतर तो विवाहित असल्याचे तिला समजल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा