सेक्स टेप प्रकरणी जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्या सेक्स टेप प्रकरणी एसआयटीकडून तपास सुरू असून एसआयटीने आता याप्रकरणी ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे प्रज्वल रेवण्णा यांना ताब्यात घेण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाल्याचं दिसत आहे.
कथित सेक्स टेप समोर आल्यानंतर रेवण्णा फरार झाले असून ते जर्मनीत असल्याची माहिती आहे. जेडीएसने याआधीच रेवण्णा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. अशातच आता या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी सुरू असून एसआयटीने ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी केली आहे. जगातील सर्व इमिग्रेशन पॉईंट्सना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रज्वल यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एका विशेष टीमची स्थापना करण्यात आली आहे.
प्रज्ज्वल हे माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांचे नातू आणि माजी मंत्री एचडी रेवण्णा यांचे पुत्र आहेत. जेडीएस हा एनडीएचा घटकपक्ष आहे. प्रज्वल हे जेडीएसकडून हसन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात मतदान पार पडले आहे. मतदानानंतर त्यांनी देशातून पलायन केले आहे. सेक्स टेप आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे प्रज्वल अडचणीत सापडले आहेत. तसेच त्यांनी एसआयटीकडे हजर होण्यासाठी सात दिवसांचा वेळ मागितला आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंच्या जाहिरातीत पॉर्न स्टारची भूमिका!
भारताच्या पंतप्रधानपदासाठी पाकिस्तानचा पाठिंबा राहुल गांधींना
रेल्वेतील फटका गॅंगचे भयानक कृत्य; पाठलाग करणाऱ्या पोलिसाला दिले विषारी इंजेक्शन
“पाकिस्तान काँग्रेसच्या शेहजाद्याला पंतप्रधान बनवण्यास आतुर आहे”
दरम्यान, मंत्री परमेश्वरा यांनी या प्रकरणी प्रज्वल रेवन्ना आणि एचडी रेवन्ना यांना हजर व्हावे लागेल असे म्हटले आहे. ते हजर न झाल्यास त्यांना अटक केली जाईल. या प्रकरणात, प्रज्वल रेवन्ना यांचे वकील अरुण जी यांनी यापूर्वी सांगितले होते की या खटल्यात अनेक पैलू आहेत ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तपासात सहकार्य करण्यासाठी ७ दिवसांचा अवधी लागेल, असे ते म्हणाले.