सिद्धू मूसवाला हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेला दहशतवादी गोल्डी ब्रार अमेरिकेत ठार झाल्याच्या अफवांना काल रात्री उशिरा पूर्णविराम मिळाला. अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या फ्रेस्नो पोलिस विभागाने गोल्डी ब्रारच्या मृत्यूच्या वृत्ताचे खंडन केले. पोलिसांनी सांगितले की, गोल्डी ब्रारच्या हत्येबाबत सुरू असलेले वृत्त अजिबात खरे नाही याची पुष्टी करू शकतो. इंटरनेट मीडिया आणि ऑनलाइन वृत्तसंस्थांवर ही चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.त्यामुळे ठार झालेला आतंकवादी गोल्डी ब्रार नाही, असे अमेरिकन पोलिसांनी सांगितले आहे.
मंगळवार (३० एप्रिल) रोजी संध्याकाळी ५.३० वाजता कॅलिफोर्नियातील फेअरमॉन्ट हॉटेलच्या बाहेर दोन तरुणांवर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळाली होती.त्यात एका ३० वर्षीय तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर दुसऱ्याला उपचारानंतर घरी सोडण्यात आले. गोळीबारात जखमी आणि मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही, असे फ्रेस्नो पोलिस विभागाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेत मारलेली व्यक्ती कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार असल्याचा अंदाज लावायला सुरुवात केली.त्यामुळे मृत व्यक्ती हा आतंकवादी गोल्डी ब्रार नसल्याचे अमेरिका पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
अमित शाह एडिटेड व्हिडीओ प्रकरणी ‘एक्स’कडून झारखंड काँग्रेसचे अकाऊंट बंद
‘देशातील संकटकाळी इटलीला पळून जाणाऱ्यांनी तिकडूनच निवडणूक लढवावी’
सिद्धू मूसवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या?
हैदराबादमध्ये अपराजित ओवैसी यांना कडवे आव्हान माधवी लता यांचे
दरम्यान, सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार हा वॉन्टेड गुन्हेगार आहे आणि त्याला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे.गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी, गोल्डी ब्रार, त्याने फेसबुक पोस्टद्वारे गायक सिद्धू मूस वालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तो चर्चेत आला होता.सिद्धू मूस वाला याची २९ मे २०२२ रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील त्याच्या गावाजवळ त्याच्या कारमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.