23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामालैंगिक शोषण प्रकरणातील संशयित खासदार रेवण्णा १५ मेला भारतात येणार

लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित खासदार रेवण्णा १५ मेला भारतात येणार

रेवण्णा हे सध्या जर्मनीला गेलेले आहेत

Google News Follow

Related

कर्नाटकमधील जनता दल सेक्युलरचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा १५ मे पर्यंत भारतात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आल्यानंतर ते लैंगिक शोषण प्रकरणावर बोलतील, असे सांगण्यात येत असून त्यामुळे या प्रकरणावरील पडदा उठेल आणि सत्य काय आहे ते बाहेर येईल, असा दावा करण्यात येत आहे.

रेवण्णा यांचे विमानाचे तिकीट इंडिया टुडेला उपलब्ध झाले असून त्यानुसार म्युनिक (जर्मनी) याठिकाणी रेवण्णा आहेत. तिथून ते १५ रोजी डॉइच लुफ्तान्सा या विमानाने येणार आहेत. बेंगळुरू येथे त्यांचे विमान उतरेल.

दरम्यान, हासन या भागाचे खासदार असलेल्या रेवण्णा यांनी एक्स या हँडलवर सत्य लवकरच समोर येईल असे म्हटले आहे. कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास समितीसमोर येत्या ७ दिवसात येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

प्रज्ज्वल रेवण्णा हे जनता दलाचे नेते एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत. २६ एप्रिल रोजी ते फ्रँकफर्ट, जर्मनीला रवाना झाले होते. त्यानंतर त्यांचे काही अश्लिल व्हीडिओ समोर आले. त्यानुसार त्यांनी घरकामाला असलेल्या महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला.

हे ही वाचा:

‘देशातील संकटकाळी इटलीला पळून जाणाऱ्यांनी तिकडूनच निवडणूक लढवावी’

सिद्धू मूसवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या?

हैदराबादमध्ये अपराजित ओवैसी यांना कडवे आव्हान माधवी लता यांचे

‘न्यूजक्लिकच्या संस्थापकाकडून दहशतवादी गटांना आर्थिक मदत’

विशेष तपास समितीने रेवण्णा यांना नोटीस बजावली आहे. त्यावर रेवण्णा यांचे वकील म्हणतात की, माझे अशील रेवण्णा हे बेंगळुरूबाहेर आहेत. येत्या सात दिवसांत ते बेंगळुरूला येतील आणि नोटिशीला उत्तर देण्यासाठी विशेष तपास समितीसमोर हजर होतील. तूर्तास रेवण्णा हे १५ मे रोजी येणार असल्यामुळे या तपास समितीला आणखी काही काळ वेळ पाहावा लागेल.

२१ एप्रिलला प्रज्ज्वल यांचे अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हीडिओ माध्यमात दिसू लागले. असे जवळपास २ हजार व्हीडिओ असल्याचे सांगण्यात आले. २६ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतरच प्रज्ज्वल हे फ्रँकफर्ट येथे गेल्याचे समजले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा