24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामासलमान खान हल्ला प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येचा तपास सीआयडी करणार

सलमान खान हल्ला प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येचा तपास सीआयडी करणार

सीआयडी अधिकाऱ्यानी पोलीस मुख्यालयातील पोलिस कोठडी आणि आत्महत्येच्या ठिकाणाची पाहणी केली

Google News Follow

Related

सलमान खान निवासस्थानावर गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपीपैकी एकाने मुंबई पोलीस मुख्यालयात असलेल्या पोलीस लॉकअप च्या बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने अटक केलेल्या चौघासह तिहार तुरुंगात असलेला लॉरेन्स बिष्णोई आणि परदेशात असलेला अनमोल बिष्णोई यांच्या विरुद्ध मोक्का कायदा लावण्यात आला होता.आरोपीने लॉकअप मध्ये केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग(सीआयडी)कडे देण्यात आला आहे.

अनुज थापन असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. अनुज थापन आणि सोनू चंदर या दोघांना गेल्या आठवड्यात पंजाब राज्यातून अटक करण्यात आली होती. या दोघांनी अटकेत असलेले हल्लेखोर विकी गुप्ता आणि सागर पाल यांना सलमान खानच्या निवासस्थानावर हल्ला करण्यासाठी शस्त्रे पुरवली होती.

अनुज याच्यावर पंजाब राज्यात हत्या, आणि खडणीचे गुन्हे दाखल असून लॉरेन्स बिष्णोई टोळीसाठी अनुज हा काम करीत होता. सलमान खानच्या निवासस्थानावर झालेला हल्ला लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून करण्यात आला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेने याप्रकरणी अटक आरोपी आणि फरार आरोपी विरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक आरोपीची ८ मे पर्यत पोलीस कोठडी घेतली होती.

४ आरोपीपैकी सोनू चंदर या आरोपीची वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडी पाठविण्यात आले, अनुज थापन, विकी गुप्ता आणि सागर पाल हे तिघे गुन्हे शाखेच्या कोठडीत होते. या तिघांना मुंबई पोलीस मुख्यालयात असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते.बुधवारी सकाळी अनुज थापन याने चादरीची किनार फाडून कोठडीतील शोचालयात गळफास लावून घेतला.अनुज बराच वेळ झाला बाहेर न आल्यामुळे इतर आरोपीनी ही बाब कोठडी ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना सूचना दिली.

हे ही वाचा:

‘देशातील संकटकाळी इटलीला पळून जाणाऱ्यांनी तिकडूनच निवडणूक लढवावी’

कोव्हीशिल्ड लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची चर्चा, पण तथ्य नाही

‘आरक्षण ना कधी काढले गेले ना कधी काढले जाणार’

सलमान खान गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीची तुरुंगातच आत्महत्या

पोलिसांनी दाराच्या फटीतून बघितले असता अनुज हा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला, ड्युटीवरील पोलिसांनी तात्काळ वरिष्ठांना ही बाब कळवून अनुजला तात्काळ जीटी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनुजचा मृतदेह जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आझाद मैदान पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागा (सीआयडी)कडे सोपविण्यात आला असून सीआयडी अधिकाऱ्यानी पोलीस मुख्यालयातील पोलिस कोठडी आणि आत्महत्येच्या ठिकाणाची पाहणी केली आहे. मोक्का कायदा लावल्यामुळे काही वर्षे तुरुंगात घालावी लागणार या भीतीने त्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा