तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील करियापट्टी भागात असलेल्या दगडखाणीत मोठा स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे.दगडखाणीत झालेल्या या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून या संख्येत भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.विरुधुनगर अग्निशमन व बचाव विभागाने या अपघाताची माहिती दिली असून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
आज (१ मे) सकाळी हा भयानक स्फोट झाला.प्राथमिक वृत्तानुसार, हा स्फोट एका स्टोरेज रूममधून झाला असून त्यात स्फोटके असल्याचे सांगितले जात आहे.घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.बचाव पथकाकडून ढिगारा साफ करण्याचे काम सुरु आहे आणि स्फोट न झालेल्या साहित्याचा शोध घेतला जात आहे.या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे.
हे ही वाचा:
अमृतपाल सिंग हा पाकिस्तानी आयएसआयच्या संपर्कात होता!
‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली यांचा भाजपात प्रवेश!
राहुल गांधींच्या वक्तव्यावर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचा आक्षेप
सुरक्षेला धोका असल्याकारणाने स्थानिक रहिवाशांनी या दगडखाणीबद्दल अनेक तक्रारी केल्या आहेत.यापूर्वी ओव्हरलोड ट्रक्समुळे अनेक अपघात देखील झाले आहेत. स्फोटापूर्वी ही खदान तात्पुरती बंद करण्यात आली होती.दरम्यान, आजच्या स्फोटामुळे ही दगडखाण कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.