‘नीट’ वैद्यकीय परीक्षेची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणाचा मृतदेह कोटामधील एका खोलीत पंख्याला लटकलेला आढळून आला. नीट परीक्षेला अवघा आठवडा उरला असताना या मुलाने हे पाऊल उचलले आहे. या मुलाचा हा परीक्षा देण्याचा तिसरा प्रयत्न होता. तिच्या खोलीत एक चिठ्ठी आढळली आहे. त्यात ‘सॉरी पापा. मी या वर्षीदेखील चांगले करू शकलो नाही,’ असे लिहिले आहे.
या मुलाचे नाव भरतकुमार राजपूत असे असून तो मूळचा राजस्थानचा आहे. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. गेल्या ४८ तासांतील संशयित आत्महत्येची कोट्यातील ही दुसरी घटना आहे.
राजपूत याने याआधी दोनदा नीटची परीक्षा दिली होती. आता ५ मे रोजी तो तिसऱ्यांदा ही परीक्षा देणार होता. तो राजीव गांधी नगर भागात पेइंग गेस्ट म्हणून राहात होता आणि गेल्या वर्षापासून वैद्यकीय प्रवेशपरीक्षेची तयारी करत होता. त्याचा पुतण्या रोहित त्याच्यासोबत या खोलीत राहात असे. तो देखील नीट परीक्षेची तयारी करत होता, असे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
आघाडीची फळी कोलमडल्यामुळे पराभव, हार्दिक पांड्याची टीका!
भक्तांकडून दक्षिणा घेतल्याने तमिळनाडू पोलिसांकडून चार पुजाऱ्यांना अटक
दिल्ली, नोएडातील ५० हून अधिक शाळांना बॉम्बची धमकी!
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन
मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता रोहितने खोली सोडली. मात्र जेव्हा तो सव्वा अकराच्या सुमारास घरी परतला तेव्हा त्याला घराचे दार आतून बंद आढळले. त्याने खिडकीतून आत डोकावले असता, त्याला रोहितचा मृतदेह आढळला. तिसऱ्या परीक्षेत तरी चांगले यश मिळवण्याच्या दडपणामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.