पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेसचे निलंबित नेते शेख शाहजहान यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या रेखा पात्रा यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘एक्स-श्रेणी’ची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. रेखा पात्रा या बसिरहाट लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून उमेदवार म्हणूनही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
आयबी अहवालाच्या आधारे, गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालमधील सहा उमेदवारांना सुरक्षा दिली आहे. ज्यात एक्स आणि वाय श्रेणीची सुरक्षा समाविष्ट आहे. रिपोर्टनुसार, या नेत्यांच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. बसिरहाटमधील उमेदवार रेखा पात्रा यांना एक्स श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. याशिवाय झारग्राममधील भाजपा उमेदवार प्रणत तुड्डा यांना एक्स श्रेणीची सुरक्षा असेल. रायगंजचे उमेदवार कार्तिक पॉल यांना वाय श्रेणीची सुरक्षा असेल. तसेच बहरामपूरचे उमेदवार निर्मल साहा यांना एक्स श्रेणीची सुरक्षा आणि जयनगरमधील उमेदवार अशोक कंडारी यांना एक्स श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. या यादीत मथुरापूरचे उमेदवार अशोक पुरकैत यांचेही नाव आहे, त्यांना एक्स श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळण्याची मागणी
अमित शहांचा बनावट व्हिडिओ: आसाम काँग्रेसच्या वॉर रूमचे समन्वयक रीतम सिंग अटकेत
मीरारोड लव्ह जिहाद प्रकरण; आरोपी मोहसीन शेखला अटक!
आमच्याविरुद्ध लढू न शकणारे आमचे फेक व्हीडिओ पसरवत आहेत!
गेल्या काही दिवसांपासून रेखा पात्रा या त्यांच्या जीवाला धोका असल्याचे वारंवार सांगत होत्या. याचं दरम्यान गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेत हे पाऊल उचलले आहे. रेखा पात्रासह गृह मंत्रालयाने बंगालच्या आणखी पाच नेत्यांना सुरक्षा पुरवली आहे. रेखा पात्रा या संदेशखाली भागातील रहिवासी असून अटक करण्यात आलेले टीएमसी नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून अत्याचाराला बळी पडलेल्या पात्रा यांना भाजपने बसीरहाट लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच रेखा पात्रा यांना शक्ती स्वरूपा असे संबोधित केले होते.