मानखुर्दमध्ये लव्ह जिहादची घटना घडली आहे.मानखुर्दयेथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक हिंदू तरुणीची फसवणूक करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.आरोपी निजाम खान याने आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढत हिंदू तरुणीचा विश्वास जिंकला आणि तिची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून सुटकेस बॅगमध्ये भरून निर्जन ठिकाणी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी आरोपी निजाम खान सध्या पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेशी संबंधित आरोपींवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज (२९ एप्रिल) पीडित तरुणीच्या कुटुंबियांशी भेट घेतली तेव्हा ते बोलत होते.दोन दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आल्याचे, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, पीडित कुटुंबियांशी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा झाली. त्यावर अशी माहिती मिळाली की, मृत तरुणी पूनम आपल्या कामानिमित्त नागपाडा येथे ये जा करत असे.त्याच दरम्यान टॅक्सी चालक निजाम खान हा तिच्या संपर्कात आला आणि त्याने तिच्याशी मैत्री केली.यानंतर त्याने १८ एप्रिल रोजी तरुणीला कल्याण येथील एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि तिला पाण्यात बडवून तिची हत्या केली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हेही वाचा..
हुथी दहशतवाद्यांचा तेलवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला!
‘काँग्रेसचा इतिहास कलंकित मात्र तरीही पाहतात सत्तेचे स्वप्न’
हाँगकाँग, सिंगापूरनंतर एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवकडून बंदी
इंदूरमध्ये कॉंग्रेस उमेदवाराचा भाजपात प्रवेश
यानंतर निजामने तरुणीला कल्याण हॉस्पिटलमध्ये नेले.मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याने तिचा मृतदेह घेऊन पळून गेला.यानंतर आरोपी निजामने तरुणीच्या शरीराचे तुकडे करून एका सुटकेस बॅगमध्ये भरू निर्जन ठिकाणी ठेवून आला.त्यानंतर निजाम तरुणीच्या परिसरात फिरत असताना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.पूनमचा दुर्दैवी मृत्यू ही श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनवरावृत्ती असून अतिशय दुःखद घटना असल्याचे मंत्री लोढा म्हणाले.या प्रकरणातील आरोपी निजाम याला अटक झाली असली तरी त्याचे साथीदार अजून फरार आहेत.या सर्वांना अटक करण्याची मागणी मंत्री लोढा यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, मातंग समाजातील बहिणींना फसवलं जातंय, आमच्या भगिनींची कट्टरपंथीयांकडून निघृण हत्या केली जातेय.मालवणी, चेंबूर, अंधेरीनंतर आता आपल्या शहरातील ही चौथी घटना आहे, त्यामुळे पोलिसांना याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या समाजकंटकांच्या विरोधात लढा देण्यासाठी सकल हिंदू समाज एकत्र झाला असून, सरकार आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करेल. तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या, बांग्लादेशींचा बंदोबस्त करावा लागेल. असे पालकमंत्री लोढा यांनी सांगितले.