अश्लील व्हिडीओ घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप असलेले जनता दल (सेक्युलर) पक्षाचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर त्यांच्या घरी मदतनीस म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ४७ वर्षीय महिलेने प्रज्वलचे वडील होलेनरसीपूरचे आमदार एचडी रेवन्ना यांचेही नाव आरोपी म्हणून घेतले आहे. हे व्हायरल व्हिडिओ मॉर्फ केले गेले आहेत आणि या संदर्भात त्यांनी तक्रारही केल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला. एचडी रेवन्ना आणि प्रज्वल हे दोघे त्यांच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार करत होते, असा दावा महिलेने तिच्या तक्रारीत केला आहे.
‘त्यांच्या घरी रूजू झाल्याच्या चार महिन्यांनंतर, रेवन्ना मला त्यांच्या खोलीत बोलावत राहिले. घरात सहा महिला कर्मचारी होत्या आणि त्या सर्वांनी प्रज्वल रेवन्ना घरी आल्यावर त्या घाबरत असल्याचे सांगितले. घरातील पुरुष कर्मचाऱ्यांनीही महिला कर्मचाऱ्यांना सावध राहण्याचा इशारा दिला,’ असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
‘जेव्हा एचडी रेवन्ना यांची पत्नी तिथे नसायची तेव्हा ते महिला कर्मचाऱ्यांना स्टोअर रूममध्ये बोलावून त्यांना फळे देताना स्पर्श करायचा. ते साडीच्या पिन काढायचा आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करायचा,’ असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रज्वल रेवण्णाने तिच्या मुलीशी प्रेमसंबंध जुळवण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर मुलीने त्याचा नंबर ब्लॉक केला, असा दावाही महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३५४ ए, ३५४ डी, ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा..
मानखुर्दमध्ये लव्ह जिहाद: निजामने हिंदू तरुणीची केली हत्या, शरीराचे तुकडे करून भरले बॅगेत!
हुथी दहशतवाद्यांचा तेलवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला!
‘काँग्रेसचा इतिहास कलंकित मात्र तरीही पाहतात सत्तेचे स्वप्न’
हाँगकाँग, सिंगापूरनंतर एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवकडून बंदी
कर्नाटकमधील कथित सेक्स स्कँडलच्या व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रकरणात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू खासदार प्रज्वल रेवन्ना यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. या स्कँडलची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी केली. या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतानाच प्रज्वल जर्मनीत गेल्याची माहिती पुढे आली आहे. ३३ वर्षीय प्रज्वल हसन लोकसभा मतदारसंघात एनडीएचे उमेदवार होते. येथे २६ एप्रिल रोजी मतदान झाले होते. जेडी(धर्मनिरपेक्षा) गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एनडीएमध्ये सामील झाले.