सरकार आल्यास राज्यघटना बदलली जाईल, हे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच, वारसा कर हा कोणत्याही प्रकारे तोडगा असू शकत नाही, तो धोकादायक ठरू शकतो, असे ते म्हणाले. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विजयाचा दावा केला.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राज्यघटना बदलण्याच्या आरोपाचा समाचार घेतला. ‘ज्यांनी सर्वाधिकवेळा राज्यघटनेत बदल केले, तेच म्हणत आहेत की आम्ही राज्यघटना बदलू. हे मोठे विडंबन आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यापूर्वी तुम्ही माझा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला पाहिजे,’ अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले.
वारसा करावरही मोदी यांनी भाष्य केले. ‘मला नाही वाटत की, हा कोणत्याही प्रकारचा तोडगा ठरू शकेल. या तोडग्यात भयानक समस्या आहेत. जर शेवटी फेरवाटपाच्या नावाने सरकार तुमचा पैसा घेईल, तेव्हा तुम्ही काय दिवस-रात्र काम कराल?, हे विचार स्टार्ट-अपच्या क्रांतीला संपुष्टात आणतील. हा तोडगा म्हणजे विरोधी पक्षांच्या व्होटबँकेला खूष करण्याचा प्रयत्न आहे,’ अशी टीका मोदी यांनी केली.
‘आपल्या राज्यघटनेत सर्व अल्पसंख्याकांच्या संपत्तीरक्षणाबाबत नमूद करण्यात आले आहे. म्हणजे जेव्हा काँग्रेस फेरवाटपाबाबत बोलतात, तेव्हा ते अल्पसंख्याकांच्या संपत्तीला स्पर्श करणार नाही. ते वक्फची संपत्ती वाटण्यावर विचार करणार नाही. मात्र त्यांच्या नजरा अन्य समुदायावर असतील,’ असा इशारा मोदी यांनी दिला.
नागरिकांच्या संपत्तीसंदर्भातील राहुल गांधी यांच्या सर्वेक्षणाला त्यांनी ‘माओवादी विचारधारा’ असे संबोधले. मनमोहन सिंग यांनी देशातील संसाधनांवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे, असे म्हटल्याचा पुनरुच्चार केला. त्यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याचाही उल्लेख केला. ‘समाजात विविध कायदे असणे हे समाजासाठी योग्य नाहीत,’ असेही मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
चेन्नईचे धडाक्यात अव्वल चार संघांमध्ये पुनरागमन!
धावगतीवरून टीका करणाऱ्यांना कोहलीचे सडेतोड प्रत्युत्तर!
मीरारोडमध्ये लव्ह जिहाद; बिर्याणीमधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार, धर्म बदलण्याची सक्ती!
६०२ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह १४ पाकिस्तानी तस्करांना अटक!
‘जिथे एक समुदाय राज्यघटनेच्या पाठिंब्याने प्रगती करतो आहे. तर, दुसरा तुष्टीकरणामुळे मागे राहिला आहे, असा देश आम्हाला नको आहे. भारतात समान नागरी कायदा वास्तवात आणण्यासाठी आम्हाला जे काही करावे लागेल, ते आम्ही करू,’ असा निर्धार त्यांनी केला.