दिल्ली दारू धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मनीष सिसोदिया यांना पुन्हा न्यायालयाकडून धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत राऊस एव्हेन्यू कोर्टाने ८ मे पर्यंत वाढ केली आहे. मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तिहार जेलमध्ये बंदिस्त आहेत.दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात ईडीने आरोप केला की, दिल्ली उत्पादन शुल्क धोरणात सुधारणा करताना अनियमितता बाळगली गेली, परवानाधारकांना अवाजवी फायदे दिले गेले, परवाना शुल्क माफ केले गेले किंवा कमी केले गेले आणि सक्षम अधिकाऱ्याच्या मंजुरीशिवाय परवाने देण्यात आले. मनीष सिसोदिया यांना ईडीशिवाय सीबीआयने अटक केली आहे.
हे ही वाचा:
ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी संदेशखालीत सीबीआयकडून छापेमारी
बोटाला शाई दाखवा आणि डोकं हलकं करा
‘सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने’
पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनात भाग घेतल्याबद्दल भारतीय विद्यार्थिनीला अटक
दरम्यान, मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत राऊस एव्हेन्यू कोर्टाने ८ मे पर्यंत वाढ केली आहे.मनीष सिसोदिया यांच्यासह विजय नायर आणि इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.याआधी राऊस एव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत २६ एप्रिलपर्यंत वाढ केली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात विलंब झाल्याचा आरोप करत सिसोदिया यांच्या वतीने जामीन अर्ज त्यांचे वकील मोहित माथूर यांनी दाखल केला होता.