बेंगळुरूने हैदराबादवर ३५ धावांनी मात करून संघाचा विजयरथ रोखला. डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील बेंगळुरूने पहिल्यांदा फलंदाजी करून २० षटकांत सात विकेट गमावून २०६ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना हैदराबादचा संघ २० षटकांत केवळ १७१ धावाच करू शकला.
हैदराबादने गुरुवारी बेंगळुरूविरोधात आपला आठवा सामना खेळला, मात्र त्यात पराभव पत्कराला लागला. सध्या हैदराबादचा संघ १० गुणांनिशी आणि ०.५७७ धावगतीसह तिसऱ्या स्थानी आहे. तर, बेंगळुरूचा संघ चार गुणांसह गुणतक्त्यात १०व्या स्थानी आहे.
हैदराबादच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी
२०७ धावांचे लक्ष्य गाठताना हैदराबादला सुरुवातीलाच धक्के बसले. सलामीवीर ट्रेविस हेड एक धाव करून परतला. त्याला विल जॅक्सने पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर अभिषेक शर्मा ३१ धावा करून धावचीत झाला. तर, शाहबाज अहमदने नाबाद ४० व पॅट कमिन्सने ३१ धावा केल्या. या तिन्ही खेळाडूंशिवाय कोणीही फलंदाज अधिक काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. मार्क्ररम सात, नितीश १३, क्लासेन सात, अब्दुल समद १०, भुवनेश्वर कुमार १३ और उनाडकटने नाबाद आठ धावा केल्या.
हे ही वाचा:
‘ममता बॅनर्जींवर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करा’
हॉर्लिक्स आता आरोग्यदायी पेय नाही; ‘फंक्शनल न्यूट्रिशनल ड्रिंक’ म्हणून नोंद!
विकासनिधी बाबत केलेल्या वक्तव्यावर निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना क्लीनचीट
सियाचीनजवळ चीनव्याप्त काश्मीरमध्ये चीनकडून रस्ता बनवण्याचा प्रयत्न
गोलंदाजांची कमाल
बेंगळुरूच्या स्वप्निल सिंह, कर्ण शर्मा और कॅमरून ग्रीन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर, विल जॅक्स और यश दयाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. सिराज आणि फर्ग्यूसन यांना एकही विकेट मिळू शकली नाही.
कोहली, पाटीदारचे अर्धशतक
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या बेंगळुरूने दमदार सुरुवात केली. विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. कर्णधार फाफ १२ चेंडूंत २५ धावा करून बाद झाला. तर, कोहलीने या हंगामातील चौथे अर्धशतक ठोकले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या रजत पाटीदार याने १९ चेंडूंत अर्धशतक ठोकले. या हंगामातील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले.
त्यांनी २० चेंडूंत दोन चौकार आणि पाच षटकारांसह ५० धावा केल्या. यात विल जॅक्सने सहा, कॅमरून ग्रीनने ३७, महिपाल लोमरोर याने सात, दिनेश कार्तिकने ११ आणि स्वप्नील सिंह याने १२ धावा केल्या. हैदराबादसाठी जयदेव उनाडकट याने तीन विकेट घेतल्या. तर, टी नटराजन याने दोन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स और मयंक मार्कंडेय याने प्रत्येकी एक विकेट घेतली.