30 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामाभाडे नाकारणाऱ्या ३२ हजार ६५८ रिक्षा चालकांचे परवाने निलंबित

भाडे नाकारणाऱ्या ३२ हजार ६५८ रिक्षा चालकांचे परवाने निलंबित

बेशिस्त, मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई

Google News Follow

Related

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागाने राबविलेल्या विशेष मोहीमेत बेशिस्त आणि मुजोर रिक्षा चालकांची चांगलीच जिरविण्यात आली आहे. या विशेष मोहिमेदरम्यान मुंबई वाहतूक विभागाने उपनगरातील ५२ हजार १८९ रिक्षा चालकावर विविध शीर्षखाली कारवाई कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई मागील पंधरा दिवसात संपूर्ण मुंबई उपनगरात करण्यात आली आहे.

मुंबई उपनगरातील रेल्वे स्थानके, मॉल, बस स्थानके व इतर ठिकाणी रिक्षा चालक हे लांब पल्ल्याचे भाडे मिळविण्याकरीता बऱ्याच वेळा नजिकचे भाडे नाकारत असल्याच्या आणि चालक गणवेश परिधान न करणे, बॅच व इतर कागदपत्रे न बाळगणे इत्यादीबाबत नागरिकांकडून प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने वाहतूक नियंत्रण शाखा मुंबई मार्फत अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी ८एप्रिल ते २२ एप्रिल पर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

हे ही वाचा:

सलमान खान गोळीबार प्रकरण – हल्लेखोरांच्या पोलीस कोठडीत वाढ!

उबाठा म्हणजे रंग बदलणारा ‘सरडा’

‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व’

पॅलेस्टाइन पाठिंब्याचे, इस्रायलविरोधाचे लोण पसरले अमेरिकेतील विद्यापीठांत

सदर विशेष मोहिमेदरम्यान एकुण ५२१८९विविध शिर्षाखाली चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विशेषतः भाडे नाकारणे या शिर्षाखाली ३२६५८, विना गणवेश ५२६८, जादा प्रवासी वाहतूक करणे ८६५० व इतर कारवाई ५६१३ असे एकूण ५२१८९ ई-चलान करवाई करण्यात आली आहे.

भाडे नाकारणाऱ्या ३२६५८ वाहनांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून विशेष मोहिमे दरम्यान बेशिस्त,आणि मुजोर रिक्षा चालकांवर करण्यात आलेल्या या कारवाईचे प्रवाशाकडून स्वागत करण्यात आले असून ही कारवाई मुंबईतील मुजोर टॅक्सी चालकांवर देखील करण्यात यावी अशी मागणी प्रवाशाकडून होत आहे. वाहतूक पोलिसांच्या या कारवाई मुळे रिक्षा चालक चांगलेच धास्तावले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा