31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणमतदानावेळी महिलांचे मोदी प्रेम; ईव्हीएमवर मोदींचा फोटो नाही तर मतदान करणार नाही

मतदानावेळी महिलांचे मोदी प्रेम; ईव्हीएमवर मोदींचा फोटो नाही तर मतदान करणार नाही

राजस्थानमधील किस्सा ऐकून नरेंद्र मोदींना अश्रू अनावर

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून आता पुढील टप्प्यांसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १०२ मतदार संघात यशस्वी पार पडल्यानंतर आणखी सहा टप्प्यातील मतदान शिल्लक राहिले आहे. पहिल्या टप्प्यातील मदतान १९ एप्रिल रोजी पार पडले आणि यादिवशीचा एक रंजक किस्सा स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन सांगितला आहे.

राजस्थानमधील हा किस्सा असून राजस्थानमधील सीकरच्या पिपरानी गावातील एका पोलिंग बुथवर काही ग्रामीण महिला मतदान करण्यासाठी आल्या होत्या. त्या जेव्हा मतदानासाठी आल्या तेव्हा त्यांना ईव्हीएमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या महिलांनी बुथमधील अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. आमच्या पंतप्रधान मोदींचा फोटो यावर का नाही? असा सवाल विचारात त्यांनी म्हटलं की, मोदींनाच आम्ही मतदान करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर हा किस्सा सांगितला आहे.

सीकर लोकसभेसाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. यावेळी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावातील महिलांचा एक गट पोलिंग बुथवर आला होता. ग्रामीण महिला मोठ्या उत्साहात मतदान करण्यासाठी आल्या होत्या. पण, ईव्हीएमवर मोदींचा फोटो न दिसल्याने त्या संभ्रमात पडल्या. त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी बुथवर हजर असलेल्या काही अधिकाऱ्यांनी महिलांना समजावून सांगितलं की, ईव्हीएमवर पंतप्रधान मोदी यांचा नाही तर त्यांच्या पक्षाचे चिन्ह असते. शिवाय त्यांच्या मतदारसंघातून नरेंद्र मोदी नाही तर भाजपाचा दुसरा उमेदवार निवडणूक लढवत आहे. खूप समजवल्यानंतर महिलांना अधिकाऱ्यांचे म्हणणे पटले. त्यानंतर महिलांनी मतदान केलं.

हे ही वाचा:

‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व’

बेकायदेशीर आयपीएल स्ट्रीमिंग ऍप प्रकरणी सायबर सेलकडून तमन्ना भाटियाला समन्स

पॅलेस्टाइन पाठिंब्याचे, इस्रायलविरोधाचे लोण पसरले अमेरिकेतील विद्यापीठांत

तेलंगणा, आंध्रमधील मुस्लिमांचे आरक्षण निवडणुकीच्या केंद्रस्थानी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे कार्यकर्ता लक्ष्मीकांत भारद्वाज यांनी शेअर केलेलं एका वृतपत्राचं कात्रण सोशल मीडियावर रिट्विट केलं आहे. पंतप्रधान मोदी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटलं आहे की, माता-भगिनींचे हे असे प्रेम पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझा संकल्प हेच कर्ज फेडण्याचा आहे. पण, लक्ष्मीकांतजी आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. घरोघरी जाऊन लोकांना मतदानाविषयी जागृत करावे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा