लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या उत्साहात पंतप्रधान मोदींना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळाली आहे.आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.यावर निवडणूक आयोगाने त्यांना क्लीन चिट दिली आहे.पंतप्रधान मोदींनी यूपीच्या पिलीभीत रॅलीत राम मंदिर आणि करतारपूर कॉरिडॉरचा केलेला उल्लेख हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, राम मंदिराच्या उभारणीचा उल्लेख धर्माच्या आधारावर मतांचे आवाहन मानत नाही.याबाबत तक्रारदार वकील आनंद जोंधळे यांना लवकरच निवडणूक आयोग उत्तर पाठवू शकते.मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाचे असे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाचा उल्लेख करत होते.त्यामुळे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन मानू शकत नाही.
पंतप्रधान मोदींची काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील पिलिभीत येथे सभा पार पडली होती.या सभेत पंतप्रधान मोदींनी राम मंदिर निर्माण आणि करतारपूर कॉरिडॉरच्या विकासाचा उल्लेख केला होता.तसेच पंतप्रधान मोदींनी राम मंदिराच्या उभारणीवरून काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला होता.या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे वकील आनंद एस. जोंधळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
हे ही वाचा:
आईस्क्रीमच्या पैशावरून वाद, ग्राहकाकडून विक्रेत्याची भोसकून हत्या!
माझ्या अंत्यसंस्काराला तरी या अशी खर्गे यांची मतदारांना निर्वाणीची साद!
खेळायला गेलेल्या दोन भावंडांचे मृतदेह धूळ खात पडलेल्या गाडीमध्ये सापडले
भारतीयाच्या हृदयाने वाचवले पाकिस्तानच्या युवतीचे प्राण
त्यांनी तक्रारीत म्हटले होते की, ९ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे एका निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदींनी हिंदू देव-देवता आणि हिंदू धर्मस्थळे, शिखांचे पवित्र स्थळ आणि शिखांच्या गुरूंच्या नावावर मते मागितली.त्यांनी पंतप्रधान मोदींवर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. इतकंच नाही तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही निवडणूक आयोगाकडे पंतप्रधान मोदींविरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला होता. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना तसे पत्र लिहिले होते.
दरम्यान, प्रचार सभेत राम मंदिराच्या उभारणीचा उल्लेख करणे हे काही आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.पंतप्रधान मोदींनी आपल्या केलेल्या कार्यकाळात केलेल्या कामाचा उल्लेख करणे म्हणजे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन नाही, असे निडवणूक आयोगाने म्हटले आहे.