लोकसभा निवडणुकीचा प्रचार सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार सुरु आहे.आपला उमेदवार निवडून येण्यासाठी पक्ष प्रमुख देखील जोर लावत आहेत.कोणी कामाचा अहवाल सादर करून मतं मागत आहे तर कोणी भावनिक साद घालून जनतेकडून मतं मागत आहेत.दरम्यान, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या जावयाच्या विजयासाठी जनतेला भावनिक साद घातल्याचे समोर आले आहे.मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटकातील कलबुर्गी येथील मतदारसंघात जनतेला भावनिक आवाहन केले आहे.ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मतदान करा अथवा करू नका, किमान माझ्या अंत्यसंस्काराला तरी या.
अफझलपूर येथील सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते बोलत होते.कलबुर्गीमधून भाजपचे विद्यमान खासदार उमेश जाधव यांच्या विरोधात काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी यांना उमेदवारी दिली आहे.सभेला संबोधित करताना खर्गे म्हणाले की, यावेळी तुम्ही( काँग्रेसच्या उमेदवाराला) मत देऊ शकला नाहीत, तर मला वाटेल की माझ्यासाठी इथे काहीच जागा नाही आणि मी तुमची मने जिंकू शकलेलो नाही.दरम्यान, २००९ आणि २०१४ मध्ये या जागेवर काँग्रेसचा विजयी झाला होता.मात्र, २०१९ मध्ये काँग्रेसला या जागेवर पराभव पत्करावा लागला होता.
हे ही वाचा:
खेळायला गेलेल्या दोन भावंडांचे मृतदेह धूळ खात पडलेल्या गाडीमध्ये सापडले
भारतीयाच्या हृदयाने वाचवले पाकिस्तानच्या युवतीचे प्राण
अरविंद केजरीवाल यांनी घोटाळ्यादरम्यान १७३ फोन नष्ट केले
अमेठी, रायबरेली भेटीपूर्वी गांधी भावंडे अयोध्येला थांबण्याची शक्यता
खर्गे पुढे म्हणाले की, तुम्ही आम्हाला (काँग्रेसला) मत द्या किंवा न द्या, परंतु कलबुर्गीसाठी मी काम केल्याचे तुम्हाला वाटत असेल तर कमीत-कमी माझ्या अंत्यसंस्काराला तरी या.भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीचा पराभव करण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात राहू, असेही ते म्हणाले.माझा जन्म राजकारणासाठी झाल्याचे ते म्हणाले.मी राजकारणातून सन्यास घेणार नसल्याचे ते म्हणाले.