30 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषखेळायला गेलेल्या दोन भावंडांचे मृतदेह धूळ खात पडलेल्या गाडीमध्ये सापडले

खेळायला गेलेल्या दोन भावंडांचे मृतदेह धूळ खात पडलेल्या गाडीमध्ये सापडले

मुंबईतील ऍन्टोप हिल येथील घटना

Google News Follow

Related

मुंबईतील अँटॉप हिल या परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. या परिसरात धूळ खात पडलेल्या एका गाडीमध्ये दोन चिमुकल्यांचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हे दोघे भावंड असल्याचे समोर आले असून त्यांची नावे साजिद आणि मुस्कान अशी आहेत. बुधवारी दुपारी हे दोघे घराजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात खेळत असताना अचानक बेपत्ता झाले होते. सायंकाळी या दोघांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान या दोघांचे मृतदेह सापडले.

साजिद (वय ७) आणि मुस्कान (वय ५) हे दोघे भावंड बुधवारी नेहमीप्रमाणे घराजवळ असलेल्या मैदानात खेळत होते. त्यानंतर दुपारी ते घरी परतले नाहीत तेव्हापासून ते बेपत्ता होते. संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने आई-वडिलांनी त्यांचा शोध सुरू केला. बऱ्याचवेळपर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला मात्र ते काही सापडले नाहीत. त्यानंतर वडिलांनी अँटॉप हिल पोलिस ठाण्यात मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

हे ही वाचा:

भारतीयाच्या हृदयाने वाचवले पाकिस्तानच्या युवतीचे प्राण

अरविंद केजरीवाल यांनी घोटाळ्यादरम्यान १७३ फोन नष्ट केले

अमेठी, रायबरेली भेटीपूर्वी गांधी भावंडे अयोध्येला थांबण्याची शक्यता

जनता दलाच्या नेत्याची गोळी झाडून हत्या!

पुन्हा एकदा कुटुंबीय आणि पोलीस त्यांचा शोध घेत असताना घराजवळील मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या भंगारातील गाडीमध्ये हे दोघे सापडून आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या दोघांचा मत्यू गाडीमध्ये गुदमरल्याने झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेने या चिमुकल्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने पपरिसरात हळहळ व्यक्त होत असून याप्रकरणात अपमृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती अँटॉप हिल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान गरंडे यांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा