भारतीय जवानांना आता युद्धभूमीवर आणि महत्त्वाच्या मोहिमांवेळी अधिक सुरक्षा मिळणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) देशातील सर्वात हलके बुलेट प्रुफ जॅकेट बनवले आहे. यामुळे पुन्हा एकदा ‘आत्मनिर्भर भारत’ हे मोदी सरकारचे धोरण चर्चेत आले आहे. या बुलेट प्रुफ जॅकेटचे वैशिट्य म्हणजे या जॅकेटमध्ये सहा गोळ्या लागल्या तरी ते जवानाचे रक्षण करण्यास सक्षम आहे.
डीआरडीओच्या या यशाची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. सध्या सैनिक वापरत असलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटचे वजन जास्त आहे. यामुळे गंभीर मोहिमांच्या वेळी सैनिकांना अतिरिक्त भार सहन करावा लागतो. मात्र, आता त्यांना यातून दिलासा मिळू शकतो, असे मंत्रालयाने म्हटले आहे. डीआरडीओ तयार केलेले हे बुलेट प्रुफ जॅकेट देशातील सर्वात हलके जॅकेट आहे.
देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट हे पॉलिमर बॅकिंग आणि मोनोलिथिक सिरॅमिक प्लेटचे बनलेले आहे. या जॅकेटमध्ये चाचणीवेळी ६ गोळ्या (स्नायपर बुलेट) घुसू शकल्या नाहीत. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे जॅकेट गोळ्या, दारुगोळापासून जवानांना संरक्षण देईल. कानपूर येथील डीआरडीओच्या ‘डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ने (डीएमएसआरडीई) हे जॅकेट तयार केले आहे. या जॅकेटची टीबीआरएल चंदीगढ येथे चाचणी घेण्यात आली.
हे ही वाचा:
“नकली शिवसेनेने सोनिया गांधींच्या भीतीने प्राणप्रतिष्ठा सोहळा टाळला”
संजय राऊतांचे निकटवर्ती प्रवीण राऊतांची ७३ कोटींची मालमत्ता जप्त
भाषणादरम्यान नितीन गडकरींना आली भोवळ, स्टेजवर कोसळले!
नुडल्सच्या पाकिटात होते दोन कोटींचे हिरे
भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे नवी दिल्लीत ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या (एआयएमए) नवव्या राष्ट्रीय नेतृत्व परिषदेत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या महत्त्वावर चर्चा केली. अलीकडच्या भू-राजकीय घडामोडींनी हे दाखवून दिले आहे की, जिथे राष्ट्रीय हितसंबंध असतात, तिथे देश युद्ध करायला मागेपुढे पाहणार नाहीत. युद्धे रोखण्यासाठी तसेच हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी आणि आवश्यक असल्यास युद्ध जिंकण्यासाठी लष्करी शक्ती आवश्यक आहे, आम्ही युद्धासाठी मागेपुढे करणार नाही, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.