पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता जगभरात वाढत आहे.याचे उदाहरण म्हणजे जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीचे सीईओ जेमी डिमन यांनी पंतप्रधान मोदींचे केलेले कौतुक.पंतप्रधान मोदींसारख्या नेत्याची अमेरिकेला गरज असल्याचे ते म्हणालेत.पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी भारतासाठी “अविश्वसनीय काम” केले आहे.
इकॉनॉमिक क्लब ऑफ न्यूयॉर्कने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जेपी मॉर्गन चेसचे सीईओ यांनी भारतात होत असलेल्या विकास कामांसाठी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.जेमी डिमन म्हणाले की, पंतप्रधान मोदी सर्व आव्हानांना धैर्याने सामोरे जात आहेत.ते म्हणाले की, अमेरिकेतही अशा नेत्याची गरज आहे.जो सर्व आव्हनांना धैर्याने सामोरे जाऊ शकतो. पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रयत्नातून ४० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे.नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सुद्धा पंतप्रधान बनतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा:
बेंगळुरूमध्ये आयकर विभागाचे १६ ठिकाणी छापे, करोडोंचे सोने, हिरे, रोख रक्कम जप्त!
‘सरकार गेल्याने उबाठा भ्रमिष्ट आणि सैरभैर’
निर्णायक क्षणी राहुल गांधी बेपत्ता असतात
जिजाजी येत आहेत, जमिनीची कागदपत्रे लपवा
पंतप्रधान मोदींच्या काळात भारतात अनेक सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या सरकारने जवळपास ७०० दशलक्ष लोकांसाठी बँक खाती उघडली आहेत आणि त्यांचे पेमेंट त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत आहे.भारतात अविश्वसनीय शिक्षण व्यवस्था आणि पायाभूत सुविधा आहेत. एका न्यायी आणि कणखर माणसामुळे संपूर्ण देशाची उन्नती होत आहे, नोकरशाही मोडून काढण्यासाठी तुम्हाला कणखर असायला हवे आणि पंतप्रधान मोदी तेच करत आहेत.राज्यांनी स्वीकारलेल्या करप्रणालीतील असमानता दूर करून पंतप्रधान मोदींच्या सरकारने भ्रष्टाचार संपवल्याचेही त्यांनी सांगितले.