27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारण'सरकार गेल्याने उबाठा भ्रमिष्ट आणि सैरभैर'

‘सरकार गेल्याने उबाठा भ्रमिष्ट आणि सैरभैर’

राजकारणातील आमच्या अनुभवापेक्षा आदित्य ठाकरेंचे वय कमी, मुख्यमंत्री शिंदेंची टीका

Google News Follow

Related

लोकसभेच्या प्रचाराकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोलीच्या सभेला उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.राज्यातील सत्तांतरामुळे भ्रमिष्ट आणि सैरभैर झालेले आता बेछुट आरोप करत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे पितापुत्रांवर केली. आमचा राजकारणातील जेवढा अनुभव आहे तेवढे तुमचे वय देखील नाही तरीही आरोप करत आहात, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांना काढला. हिंगोली मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हिंगोलीत बाबुराव कदम या सर्वसामान्याला संधी दिली, हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे. राज्याच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले. हे सरकार अहोरात्र काम करणारे सरकार आहे. राज्यात काही भागात गारपीट, अवकाळी पाऊस सुरु आहे. निवडणूक असली तरी शेतकऱ्यांचे नुकसान भरून देण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शासनाने आतापर्यंत १५ हजार कोटी रुपये नुकसान भरपाई दिली असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

विरोधांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यांचे वय नाही ते आता सैरभैर होऊन आरोप करत आहेत. सत्ता गेल्याने ते भ्रमिष्ट झाले आहेत. मला नीच म्हणाले. एका शेतकऱ्याच्या मुलाला शिवी दिली. हा मराठा समाजाचा अपमान आहे. त्याचे उत्तर हा समाज मतपेटीतून देईल, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

निर्णायक क्षणी राहुल गांधी बेपत्ता असतात

सचिन तेंडुलकरचे १०० शतकांव्यतिरिक्त हे रेकॉर्ड मोडणे अशक्य

जिजाजी येत आहेत, जमिनीची कागदपत्रे लपवा

हार्दिक पंड्याच्या मदतीला सेहवाग आला धावून 

संविधान बदलणार या भूलथापा सुरु आहेत. संविधान कुणी बदलू शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बाबासाहेबांचा अपमान काँग्रेसने केला. त्यांचा निवडणुकीत परभाव केला. त्यामुळे काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की मराठा आंदोलनाला मूका मोर्चा अशी ज्यांनी टिंगल केली ते महाविकास आघाडीत आहेत. मात्र आम्ही मराठा समजाला १० टक्के आरक्षण दिले आणि ते कायद्याच्या चौकटीत टिकवून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक समाजाला सोबत घेऊन सरकार चालवतोय
विरोधकांकडून मुस्लिम समाजाला घाबरवले जात आहे. मात्र माझे जिवाभावाचे कार्यकर्ते हे मुस्लिम बांधव आहेत. माझ्या गाडीचे सारथी मुस्लिम आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मुसलमानांना मिळतो. काँग्रेसने मुस्लिम आणि दलितांना केवळ व्होट बँक म्हणून वापरले. आम्ही प्रत्येक समाजाला गुणगोविंदने सोबत घेऊन पुढे जात आहोत, असे त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा