महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये बोगस लष्करी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. वडोदरा येथील हा बोगस अधिकारी असून वारंवार तो महाराष्ट्रात येत होता. फारुख शेख या बोगस नावाने तो फिरत होता. त्याचे मुळ नाव राहील शफी असे आहे. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये दारूची तस्करी करत होता. त्याला नंदुरबार पोलिसांनी अटक केली आहे.
नंदुरबारमध्ये वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असताना हा प्रकार समोर आला. शेख याने लष्करातील मोठ्या पदाचा गणवेश परिधान करून कारमधून बाहेर आला आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांवर आरडाओरडा केला. मात्र, इतक्यात एक हवालदार त्याच्याजवळ आला आणि त्याने ‘मेजर’कडून सलामी घेतली. त्यामुळे बनावट मेजर मोहम्मदचा पर्दाफाश झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
हेही वाचा..
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही
“नरेंद्र मोदींमुळेचं पाकिस्तान शांत बसलाय”
शाहजहान शेखचा पूर्वीचा अहंकार गायब; पोलीस गाडीत बसून ढाळतोय अश्रू
‘निवडणुकीचे वार्तांकन करण्याची परवानगी न दिल्याचा ऑस्ट्रेलियन पत्रकाराचा आरोप दिशाभूल करणारा’
बनावट मेजरच्या कारची तपासणी केली असता नंदुरबार पोलिसांना दीड लाख रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या सापडल्या. नंदुरबार पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करत होता. इतकेच नाही तर त्याच्याकडे बनावट ओळखपत्रही होते. तो वडोदरा येथे नोकरीला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, आरोपी मोहम्मद फारुख शेख हा मूळचा महाराष्ट्रातील जळगावचा असून तो वडोदरा येथील गोरवा येथे राहत होता. महाराष्ट्रातून दारूने भरलेली गाडी तो गुजरातला नेत असे. लष्कराच्या गणवेशात तो हे काम करत असे. त्यामुळे तो गुजरात-महाराष्ट्र सीमा सहज ओलांडू शकला. मात्र त्याने हवालदाराला सॅल्यूट केल्यानंतर त्याच्यावर संशय आला आणि अखेर त्याला अटक करण्यात आली.