भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात झाला होता. त्याचे आयोजन भारताने केले होते. आता या दोघांचा पुढचा सामना २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये होणार आहे. पण त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. २०२५ मध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे समोर आले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे आयोजन पाकिस्तान करत आहे. यापूर्वी, आशिया चषक २०२३ मध्ये आपण असेच पाहिले आहे. त्या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानने केले होते. परंतु टीम इंडियाने आपले सामने श्रीलंकेत खेळले. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. पाकिस्तान दौऱ्याबाबत भारताकडून सुरक्षेचे कारण देण्यात आले आहे.
आता चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत वृत्त समोर आले आहे. यात पाकिस्तानच्या दौरा करून टीम इंडिया पाकविरुद्ध मालिका खेळण्याचे विसरून जा. तर, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ साठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौराही करणार नाही. या स्पर्धेचे स्थळ बदलले जाऊ शकते किंवा हायब्रिड मॉडेल वापरले जाऊ शकते.
हेही वाचा :
“नरेंद्र मोदींमुळेचं पाकिस्तान शांत बसलाय”
शाहजहान शेखचा पूर्वीचा अहंकार गायब; पोलीस गाडीत बसून ढाळतोय अश्रू
नोएडातील भंगार माफिया रवी काना, मैत्रीण काजल झा यांना थायलंडमधून अटक!
‘बेकायदा स्थलांतरितांना रवांडामध्ये पाठविण्याच्या मार्गात आता कसलेही अडथळे नाहीत’
पाकिस्तान क्रिकेट संघ २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारत दौऱ्यावर आला होता. मात्र, विश्वचषकासाठी भारतात येण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेक मागण्या केल्या होत्या. जर टीम इंडियाने आशिया कपसाठी पाकिस्तानचा दौरा केला नाही तर पाकिस्तानही वर्ल्डकपसाठी भारताला भेट देणार नाही. आता चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पुढे काय निकाल लागतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जर टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नसेल, तर स्थळ बदलले जाऊ शकते नाहीतर हायब्रीड मॉडेलचा वापर केला जाणार हा येणारा काळच ठरवेल.