कर्नाटकमध्ये कॉंग्रेस नगरसेवकाच्या मुलीचा एकाने भोसकून खून केल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची भेट घेतली. त्यांची भेट घेऊन त्यांना आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे ते म्हणाले. १८ एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता.
हेही वाचा..
भगवान रामाचा फोटो असलेल्या प्लेटमधून बिर्याणीची विक्री?
कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याचा दावा; मुलीची हत्या ही ‘केरळ स्टोरी’ प्रमाणेचं!
‘काँग्रेसच्या काळात हनुमान चालीसा ऐकणे सुद्धा गुन्हा’
न्यायालयाची नवी अट; पतंजलीच्या जाहिरातीएवढीच जाहिरात देऊन माफी मागा!
हुबळी येथील बिव्हिबी कॉलेजच्या आवारात हिरेमठ यांची मुलगी नेहा हिच्यावर हल्ला करण्यात आला होता. फयाज असे आरोपीचे नाव असून तो तिचा माजी वर्गमित्र होता. त्याने नेहावर अनेकवेळा चाकूने वार केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या प्रकरणी फयाज याला अटक करण्यात आली आहे. नेहाला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी ती मृत असल्याचे घोषित केले.
सिद्धरामय्या यांनी हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या काँग्रेस नगरसेवकाला या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून हा खटला विशेष न्यायालयात चालवू, असे त्यांनी सांगितले. याबद्दल बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, हिरेमठ कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आलो आहे. हि घटना धक्कादायक आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी सांगितले.