24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेष'काँग्रेसच्या काळात हनुमान चालीसा ऐकणे सुद्धा गुन्हा'

‘काँग्रेसच्या काळात हनुमान चालीसा ऐकणे सुद्धा गुन्हा’

पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी (२३ एप्रिल) राजस्थानमधील टोंक आणि सवाई माधोपूर येथे एका विशाल जाहीर सभेला संबोधित केले.हा भाग माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेत मोठी गर्दी जमली होती. यावेळी ते म्हणाले की, राजस्थानने प्रत्येक वेळी भाजपला पूर्ण आशीर्वाद दिला आहे.तसेच हनुमानजयंतीचा पवित्र दिवस असल्याचेही ते म्हणाले.हनुमान जयंतीच्या संपूर्ण देशाला शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी ‘बजरंग बली की जय’ ची घोषणाही केली.

आज जो उत्साह दिसत आहे तो सशक्त भारतासाठी आशीर्वाद आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, सुरक्षित राष्ट्र आणि स्थिर सरकार असणे किती महत्त्वाचे आहे हे राजस्थानला चांगलेच ठाऊक आहे, म्हणूनच २०१४ असो किंवा २०१९, राजस्थानने एकत्र येऊन देशात भाजपचे शक्तिशाली सरकार बनवण्याचा आशीर्वाद दिला होता.

पंतप्रधान मोदीं म्हणाले की, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत राजस्थानच्या जनतेने २५ पैकी २५ जागा भाजपला दिल्या होत्या.एकता ही राजस्थानची सर्वात मोठी संपत्ती असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.ते पुढे म्हणाले, लक्षात ठेवा, जेव्हा-जेव्हा आपली फाळणी झाली, त्याचा फायदा देशाच्या शत्रूंनी घेतला आहे. आताही राजस्थानचे विभाजन करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. राजस्थानने याबाबत काळजी घेण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. २०१४ मध्ये तुम्ही मोदींना दिल्लीत सेवेची संधी दिली, त्यानंतर देशाने असे निर्णय घेतले, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल, ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

मतदारांचा आशीर्वाद मोदीजींपर्यंत पोहोचवा

राजौरीत मशिदीच्या बाहेर दहशतवाद्यांचा गोळीबार; सैनिकाच्या भावाची गोळी झाडून हत्या!

ऍरिझोना येथील गाडी अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत चौथ्या क्रमांकाचा लष्करी खर्च करणारा देश

ते पुढे म्हणाले की, २०१४ नंतर आणि आजही दिल्लीत काँग्रेसचे सरकार असते तर काय झाले असते याचा विचार करा.जर असे झाले असते तर जम्मू-काश्मीरमध्ये अजूनही आमच्या सैन्यावर दगडफेक होत राहिली असती, शत्रू अजूनही सीमेपलीकडून आमच्या सैनिकांचा शिरच्छेद करत असते, आमच्या सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन (ओआरओपी) योजनाही मिळाल्या नसत्या आणि आपल्या माजी सैनिकांना एक लाख कोटी रुपये देखील मिळाले नसते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि त्यांची टीम कामात व्यस्त असल्याने माफिया आणि गुन्हेगारांना राजस्थान सोडून पळून जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात एका छोट्या दुकानदाराला त्याच्या दुकानात बसून हनुमान चालीसा ऐकत असल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. तुम्ही कल्पना करू शकता, काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणेही गुन्हा ठरतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

काँग्रेसने राम-राम म्हणणाऱ्या राजस्थानमध्ये रामनवमीवर बंदी घातली होती, मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांना सरकारी संरक्षण दिले होते, तुष्टीकरणासाठी
मालपुरा, करौली, टोंक आणि जोधपूरला दंगलीच्या आगीत टाकून दिले. पंतप्रधान मोदी गर्जना करत म्हणाले की, आता भाजपचे सरकार आल्यानंतर लोकांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह लावण्याचे धाडस कोणात नाही, आता तुम्ही शांतपणे हनुमान चालीसा गा आणि रामनवमी साजरी करा, हीच भाजपची गॅरंटी आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा