29 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषबँकॉकहून आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत सापडले पिवळ्या जातीचे १० ॲनाकोंडा!

बँकॉकहून आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत सापडले पिवळ्या जातीचे १० ॲनाकोंडा!

बेंगळुरू कस्टम विभागाने तस्कराच्या विमानतळावर आवळल्या मुसक्या

Google News Follow

Related

जगात विविध प्रकारच्या वस्तूंची तस्करी केली जाते. कधी गांजा आणि चरस, कधी सोने तर कधी दुर्मिळ प्राणी-पक्षी. या तस्करीच्या धंद्यात दररोज लोक पकडले जातात, मात्र तस्करीचा धंदा बेधडक सुरू आहे. दरम्यान, बेंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर तस्करीचे प्रकरण समोर आले आहे.ॲनाकोंडा सापाची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाला १० जिवंत पिवळ्या ॲनाकोंडाची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने हे १० ॲनाकोंडा आपल्या बॅगमध्ये लपवून बँकॉकमधून आणले होते. बेंगळुरू कस्टम विभागाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. बेंगळुरू कस्टम विभागाने सांगितले की, अधिकाऱ्यांनी बँकॉकहून येणाऱ्या एका प्रवाशाला विमानतळावर थांबवले आणि त्याच्या बॅगची झडती घेतली. झडतीदरम्यान त्याच्या बॅगेतून १० ॲनाकोंडा सापडले. सध्या त्याला अटक करण्यात आली आहे.

 

बेंगळुरू कस्टम विभागाने सांगितले की, आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. वन्यप्राण्यांची तस्करी खपवून घेतली जाणार नाही.दरम्यान, पिवळा ॲनाकोंडा ही एक नदीची प्रजाती आहे, जी बऱ्याचदा पाणवठ्यांजवळ आढळते.पिवळे ॲनाकोंडा सामान्यतः पॅराग्वे, बोलिव्हिया, ब्राझील, ईशान्य अर्जेंटिना आणि उत्तर उरुग्वे येथे आढळतात. कायद्यानुसार, वन्यजीव व्यापार आणि तस्करी भारतात बेकायदेशीर आहे.

बेंगळुरू कस्टम विभागाने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर ॲनाकोंडाची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.पथकाने जेव्हा त्याची बॅगची तपासणी केली तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.कस्टम विभागाने सांगितले की, बॅगमध्ये पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पिशव्या होत्या, आणि त्यातून विचित्र प्रकारचा आवाज ऐकू येत होता.जेव्हा पथकाने ते ओपन केले तेव्हा आश्चर्यचकित करणारे दृश्य होते.त्यामध्ये एकूण १० ॲनाकोंडा बाहेर पडले.यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला. त्या व्यक्तीला तात्काळ अटक करण्यात आली असून पथकाने वन्यजीव विभागाच्या ताब्यात दिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा