तैवानला पुन्हा एकदा जोरदार भूकंपाचे धक्के बसले आहेत. तैवानची राजधानी तैपेई या शहराला सोमवारी सायंकाळपासून ते मंगळवार पहाटेपर्यंत जोरदार भूकंपाचे धक्के बसले आहेत. या जोरदार भूकंपाने तैवान हादरलेले असून यात १७ जण जखमी झाले आहेत. केंद्रीय हवामान प्रशासनाने सांगितले की, पूर्व हुआलियनमध्ये उद्भवलेला भूकंप हा ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. तर, एक भूकंपाचा धक्का ५.५ रिश्टर स्केलचा होता आणि त्याचा उगम पूर्व हुआलियनमध्ये झाला होता. हा प्रदेश ३ एप्रिल रोजी झालेल्या ७.४ तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू होता, ज्यामुळे डोंगराळ प्रदेशात भूस्खलन झाले, असे एएफपीने एका अहवालात म्हटले आहे.
सोमवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजून ८ मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजता) केंद्रीय हवामान प्रशासनानुसार राजधानी तैपेईमध्ये पहिला भूकंपाचा धक्का जाणवला. तर, पुढे स्थानिक वेळेनुसार मंगळवारी पहाटे अडीचच्या (भारतीय वेळेनुसार १२ वाजता) सुमारास एकापाठोपाठ एक दोन तीव्र भूकंपाचे धक्के बसले.
“मी माझे हात धुत होतो, आणि अचानक मला वाटले की चक्कर आल्यासारखे वाटले,” असे तैपेईच्या डान जिल्ह्यात राहणाऱ्या ऑलिव्हियर बोनिफेसिओ या पर्यटकाने सांगितले. तसेच खोलीत पाऊल टाकले आणि लक्षात आले की इमारत हलत आहे तेव्हाच लक्षात आले की हा दुसरा धक्का होता, असेही तो म्हणाला.
हे ही वाचा:
…तर साहेबांनी अजितदादांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी तरी दिली असती का?
‘पुतना‘ मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना मोदीजींमध्ये ‘पुतीन‘ दिसायला लागलेत!
सलमानच्या घरावर हल्ल्यासाठी वापरलेले पिस्तुल सापडले तापी नदीच्या पात्रात
सिंगापूरनंतर हाँगकाँगने देखील एमडीएच आणि एवरेस्टच्या मसाल्यांवर घातली बंदी!
हुआलियन प्रदेश हा ३ एप्रिल रोजी झालेल्या ७.४ तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू होता, ज्यामुळे डोंगराळ प्रदेशात भूस्खलन होऊन रस्ते बंद झाले होते तर मुख्य हुआलियन शहरातील इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या भूकंपात १७ जणांचा मृत्यू झाला होता. १९९९ नंतर या देशात ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप हा सर्वात भीषण होता. तैवानमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के बसत असतात.