पोलिसांच्या छाप्यामुळे संशयाने पछाडलेल्या ‘चांदणी बार’ मालकाकडून ग्राहकाला बेदम मारहाण करून लूटमार करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या ग्राहकाच्या तक्रारीवरून मुलुंड पोलीसांनी बार मालकासह ४ जणांविरुद्ध कोंडून ठेवून मारहाण करणे, तसेच जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी बारमालकासह चौघांना सोमवारी अटक करण्यात आली आहे.
मुलुंड पश्चिम डम्पिंग रोड, या ठिकाणी असलेल्या चांदणी डान्स बारवर गेल्या महिन्यात पोलिसांनी छापा टाकला होता. यादरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बार बालांची सुटका करून मालकासह अनेकांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.छापेमारीच्या तासभर अगोदर झोहेल इकबाल शेख हा चांदणी बार मध्ये बसलेला होता व छाप्याच्या काही वेळापूर्वी तो बारमधून बाहेर पडला होता. पोलिसांना डान्स बारची टीप झोहेल याने दिल्याचा संशय चांदणी बार मालक चौधरी याला आला होता.
हे ही वाचा:
‘पुतना‘ मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना मोदीजींमध्ये ‘पुतीन‘ दिसायला लागलेत!
सिंगापूरनंतर हाँगकाँगने देखील एमडीएच आणि एवरेस्टच्या मसाल्यांवर घातली बंदी!
भाजपाने निकालापूर्वीच लोकसभेचे खाते उघडले! सुरतमध्ये मुकेश दलाल बिनविरोध विजयी
घराणेशाहीच्या कारखान्याला लोकांनी कुलूप लावले; राहुल, अखिलेश शोधत आहेत चाव्या!
गेल्या आठवड्यात झोहेल हा पुन्हा चांदणी बार मध्ये मनोरजनासाठी आला असता संशयाने पछाडलेल्या बार मालक चौधरी याने झोहेलचा मोबाईल फोन हिसकावून दोन जणांनी त्याला बार मधील एका खोलीत कोंडून ठेवत पुलीस को खबर देता है क्या असे बोलून बार मालक आणि इतर तिघांनी त्याला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्याच्या खिशातील पैसे काढून घेत त्याला एका रिक्षातून ऐरोली येथे सोडून पळ काढला. या प्रकरणी तक्रारदार याने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून बार मालक चौधरी आणि इतर तिघांना सोमवारी अटक केली आहे.