पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी(२२ एप्रिल) अलीगढमध्ये मोठ्या सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “गेल्या वेळी जेव्हा मी अलिगडमध्ये आलो होतो तेव्हा मी तुम्हा सर्वांना एक विनंती केली होती की, सपा आणि काँग्रेसचा परिवारवाद, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या कारखान्याला टाळे लावून टाका.तुम्ही इतके मजबूत टाळे लावले आहे की दोन्ही राजपुत्रांना आजपर्यंत चावी सापडली नाही.
ते पुढे म्हणाले की, चांगल्या भविष्याची आणि विकसित भारताची गुरुकिल्ली तुमच्याकडे आहे.आता देशाला गरिबीपासून मुक्त करणे, देशाला पूर्णपणे भ्रष्टाचारपासून मुक्त करणे आणि घराणेशाहीच्या राजकारणातून मुक्त करण्याची वेळ आली आहे.त्यासाठी पुन्हा एकदा ‘मोदी सरकारची’ गरज आहे.
हे ही वाचा:
देशाच्या कर उत्पन्नात १७.७ टक्क्यांनी वाढ
अमेरिकेचा पाकला झटका, क्षेपणास्त्र निर्मितीसाठी मदत करणाऱ्या कंपन्यांवर बंदी!
बिष्णोई गँगकडून जितेंद्र आव्हाडांना धमकी
बिहारच्या चंपारणमध्ये ‘लव्ह जिहाद’!
‘देशापेक्षा मोठे काहीही नाही. देशाची एवढी महत्त्वाची निवडणूक सुरू आहे, आपण सर्व कामे सोडून मतदान केले पाहिजे. सकाळी लवकर, सूर्य उगवण्यापूर्वी, नाश्ता करण्यापूर्वी मतदान करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी जनतेला केले.’दंगल, खून, टोळीयुद्ध, खंडणी वगैरे हे सपा सरकारचे ट्रेडमार्क होते, ही त्यांची ओळख होती आणि त्यांची राजनीती देखील यावरूनच चालत असे.मात्र, आता योगीजींच्या सरकारमुळे नागरिकांची शांतता भंग करण्याची कोणाची हिंम्मत नाहीये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘आधी कलम ३७० च्या नावाखाली फुटीरतावादी जम्मू-काश्मीरमध्ये अभिमानाने राहत होते आणि आमच्या जवानांवर दगडफेक करत होते. मात्र,आता याला ‘फुल स्टॉप’ लागला आहे.काँग्रेस आणि सपा सारख्या पक्षांनी नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण केले आणि मुस्लिमांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कधीही काहीही केले नाही.जेव्हा मी पसमंदा मुस्लिमांच्या दुरवस्थेबद्दल चर्चा करतो तेव्हा यांच्या डोक्यावरील केस उभे राहतात.कारण वरच्या लोकांनी मलई खाल्ली आणि पसमांदा मुस्लिमांना त्यांच्या परिस्थितीत जगण्यासाठी भाग पाडले.