गुप्तपणे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तयार करू पाहणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने मोठा झटका दिला आहे.क्षेपणास्त्र निर्मितीसाठी पाकिस्तानला साहित्य पुरविणाऱ्या चिनी आणि बेलारुसमधील कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली आहे.अमेरिकेत बंदी घालण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये चीन मधील तीन आणि बेलारुसमधील एक कंपनी आहे.
चीनमधील तीन आणि बेलारुसमधील एक अशा चार कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली आहे. या चार कंपन्या पाकला क्षेपणास्त्र निर्मिती करण्यासाठी सामग्री आणि उपकरणांचा पुरवठा करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे या चार कंपन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यातआला.यामध्ये चीन स्थित शिआन लाँगडे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट लिमिटेड, टियांजिन क्रिएटिव्ह सोर्स इंटरनॅशनल ट्रेड, ग्रॅनपेक्ट कंपनी लिमिटेड आणि बेलारूसच्या मिन्स्क व्हील ट्रॅक्टर प्लांट अशा चार कंपन्यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
बिहारच्या चंपारणमध्ये ‘लव्ह जिहाद’!
काँग्रेस बेकायदा, घुसखोर मुस्लिमांमध्ये संपत्तीचे वाटप करेल!
ममता सरकारला मोठा झटका, कोलकाता उच्च न्यायालयाने शिक्षक भरती केली रद्द!
सलमान खानच्या घराजवळ गोळीबार करून पिस्तुल तापी नदीत फेकल्याची आरोपींची कबुली
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, या कंपन्या क्षेपणास्त्र बनवण्यात पाकिस्तानला मदत करत होत्या. या कंपन्यांनी पाकिस्तानला लांब पल्ल्याच्या लक्षाचा भेद करण्यासाठीच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रच्या निर्मितीसाठी फिलामेंट वायडिंग, स्टीर वेल्डिंगसह अन्य उपकरणांचा पुरवठा केल्याचे उघड झाले आहे.कोणतेही चुकीचे पाऊल रोखण्यासाठी अमेरिका नेहमीच कटिबद्ध आहे, असे मिलर म्हणाले.त्यामुळे या कंपन्यांवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे.