केंद्र सरकारचे कर उत्पन्न सातत्याने वाढत असल्याचे आढळून आले आहे. मार्च २०२४ ला संपलेल्या आर्थिक वर्षात भारताचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन हे १७.७ टक्क्यांनी वाढले आहे. याचं आधारावर हे कर संकलन वाढून १९.५८ कोटी रुपये झाले आहे. आयकर विभागाने सांगितले की, ही रक्कम अंदाजापेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारला दिलासा मिळाला आहे.
२०२३- २४ या आर्थिक वर्षातील प्रत्यक्ष कर संकलनाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, निव्वळ संकलन हे १९.५८ लाख कोटी रुपये आहे. त्याआधीच्या वर्षी हा आकडा १६.६४ कोटी रुपये होता. म्हणजेच गेल्या एका वर्षात निव्वळ संकलन १७.७ टक्क्यांनी वाढले आहे. अर्थसंकल्पात १८.२३ लाख कोटी रुपयांच्या कर संकलनाचा अंदाज होता, तो सुधारित करून १९.५८ लाख कोटी करण्यात आला.
प्रत्यक्ष कराचे एकूण संकलन हे २३.३७ लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या १९.७२ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत १८.४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण कॉर्पोरेट कर संकलन ११.३२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत १३.०६ टक्क्यांनी वाढले आहे. निव्वळ कॉर्पोरेट कर संकलन हे ९.११ लाख कोटी रुपये आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत १०.२६ टक्क्यांनी वाढले आहे.
हे ही वाचा:
इराकमधून सीरियातील अमेरिकी लष्करी तळावर पाच रॉकेट डागले!
न्यूज २४ चा माधवी लता यांच्याबाबत खोडसाळपणा, पोस्ट हटवली!
सांगलीतून विशाल पाटील लोकसभा अपक्ष लढणार?
न्यूझीलंडने तिसऱ्या टी-२० मध्ये पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा उडवला
गेल्या आर्थिक वर्षात सकल वैयक्तिक आयकर संकलन हे २४.२६ टक्क्यांनी वाढून १२.०१ लाख कोटी रुपये झाले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात हा आकडा ९.६७ लाख कोटी रुपये होता. २०२३- २४ या आर्थिक वर्षात निव्वळ वैयक्तिक आयकर संकलनात २५.२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि १०.४४ लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. मागील आर्थिक वर्षात हीच रक्कम ८.३३ लाख कोटी रुपये होती.