अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून आपल्या अभियानाची छाप टाकणारा चिन्मय आज आपल्या मुलाच्या नावामुळे ट्रोल होत आहे.चिन्मयने त्याच्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवले आहे आणि याच नावामुळे त्याला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.सोशल मीडियावर वाढता रोष पाहून चिन्मय एक मोठा निर्णय घेतला आहे.
अभिनेत्याने त्याच्या मुलाचे नाव ‘जहांगीर’ असं ठेवलं आहे. यामुळे त्याला सोशल मीडियावर तुफान ट्रोल केलं जात आहे. चिन्मयने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका साकारल्या आहेत.छत्रपती शिवरायांची भूमिका आणि त्याउलट मुलाचे नाव जहांगीर ठेवल्याने नेटकऱ्यांनी हाच मुद्दा पकडला.याबद्दल चिन्मय आणि त्याच्या पत्नीने शनिवारी (२० जानेवारी) व्हिडीओ शेअर करत त्याच्या पत्नीने नावाचा अर्थ आणि कारण सांगत नेटकऱ्यांना योग्य ते स्पष्टीकरण दिलं होत.परंतु नेटकऱ्यांचे काही समाधान झाले नाही.इतकच नव्हे तर चिन्मयला काहींना पाकिस्तान किंवा आफगणिस्तानमध्ये जाण्याचा देखील सल्ला दिला होता.
यावर चिन्मयने आज एक व्हिडिओ पोस्ट केला आणि यापुढे शिवाजी महाराजांची भूमिका करणार नसल्याचे सांगितले.चिन्मयच्या या मोठ्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.चिन्मयने व्हिडीओमध्ये सांगितले की, “नमस्कार, व्यवसायाने मी एक अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. काल माझी पत्नी नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ माझ्या मुलाच्या ‘जहांगीर’ नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दलचा होता. माझ्या कुटुंबाबद्दल अतिशय घाणेरड्या आणि अश्लाघ्य कमेंट्स पास केल्या जात आहेत. माझ्या पत्नीनं व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर देखील लोक कमेंट्स करत आहेत. आता लोकं मुलाच्या पितृत्वापासून ते आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर शंका घेऊ लागलेत. एक व्यक्ती म्हणून मला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे.”
हे ही वाचा:
‘हिंदुत्व सोडणाऱ्यांनी गाण्यात तरी ‘जय भवानी’ शब्द का वापरावा’
‘ईडीच्या कार्यक्षमतेत २०१४नंतर सुधारणा’
मुंबईतल्या भाजप कार्यालयाला आग!
‘जे लोक निवडणूक जिंकू शकत नाहीत त्यांना राज्यसभेवर पाठवले जाते’
“मी अभिनेता आहे पण म्हणून माझ्या मुलाला किंवा पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर सोशल मीडियावरुन होत असेल तर त्याच्यासाठी मी बांधील नाही. माझ्या कामावरुन मला वाटेल ते बोलू शकता, तुम्हाला ते आवडलं नाही आवडलं पण माझ्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे, असं मला वाटत नाही. मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं? यावर मी आधी बऱ्याचदा बोललो आहे, तर त्या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. माझ्या पत्नीनेही काल व्हिडीओमध्ये याबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे हे मी बोलून वेळ वाया घालवत नाही. मी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारतो. आतापर्यंत सहा चित्रपटांमध्ये ती भूमिका मी साकारली आहे. तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का आहे? हा ट्रोलर्सचा प्रमुख सूर आहे.”, असे चिन्मय म्हणाला.
ते पुढे म्हणाले की, “माझ्या मुलाचा जन्म २०१३ साली झाला आज तो ११ वर्षांचा आहे. हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं ते आता होतंय. मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या आणि देशभरातील लाखो लोकांचं प्रेम दिलं. फक्त मराठीच नाही अमराठी लोकांचंही प्रेम या भूमिकेने मला दिलं आहे. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशाप्रकारे त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रपणे सांगतो की, इथून पुढे मी ही भूमिका साकारणार नाही. कारण मी करत असलेलं काम, मी केलेली भूमिका, या गोष्टींचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर वडील, नवरा, कुटुंब प्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं खूप महत्वाचं आहे.
मला याचं खूप वाईट वाटतंय कारण माझ्या मनात महाराजांबद्दल जी भक्ती किंवा श्रद्धा आहे तेच मी भूमिकेतून मांडलं. माझ्या गाडीमध्ये देखील जिथे लोक गणपतीची मूर्ती ठेवतात, मी तिथे महाराजांची मूर्ती ठेवली आहे. हा दिखावा नाहीये प्रेम आहे आणि श्रद्धा आहे. मी या गोष्टीचं स्पष्टीकरण देणार नाही.त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांसमोर हे जाहीर करू इच्छितो की, इथून पुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही. नमस्कार, असे चिन्मय मांडलेकर म्हणाले.दरम्यान, अभिनेत्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना एकच धक्का बसला आहे.