जम्मू विभागातील पुंछ जिल्ह्यात पोलीस आणि सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.दहशतवाद्यांसाठी ओजीडब्ल्यू म्हणून काम करणाऱ्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी रविवारी(२१ एप्रिल) अटक केली आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या मुख्याध्यापकाकडून एक पाकिस्तानी पिस्तूल आणि दोन चिनी ग्रेनेडही जप्त करण्यात आले आहे.
कमरुद्दीन असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.पोलिसांनी सांगितले की, पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट परिसरात रविवारी सेनेच्या ६ सेक्टर ,लष्कराच्या ३९ आरआर, रोमिओ फोर्सने पोलीस आणि एसओजी पूंछ यांनी हरी बुधा येथे संयुक्त कारवाई केली. या दरम्यान कमरुद्दीनला अटक करण्यात आले.तो अतिरेक्यांसह ओव्हर ग्राउंड वर्कर (OGW) म्हणून काम करत होता, असे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
हिंदू मुलीवर अत्याचार करून प्राणघातक हल्ला
हैदराबादची ‘मालवाहतूक ट्रेन’ सुसाट; दिल्लीला पराभूत करून दुसऱ्या क्रमांकावर झेप
कर्नाटकमध्ये भाजप नेत्याच्या मुलासह चौघांची हत्या
राजस्थानमध्ये वऱ्हाडांच्या कारला अपघात, ९ जणांचा मृत्यू!
ताब्यात घेण्यात आलेला कमरुद्दीन व्यवसायाने शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे.तपासादरम्यान त्याच्या घरातून पाकिस्तानी बनावटीचे पिस्तूल आणि दोन चिनी बनावटीचे ग्रेनेड जप्त करण्यात आले.जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा वापर पूंछ भागातील आगामी निवडणुकीत होण्याचा संशय असून पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे.
या पूर्वी शनिवारी रियासी जिल्ह्यातील दलास बरनेली भागात एक दहशतवाद्यांच्या ठिकाणाला उध्वस्त करण्यात आले.या ठिकाणाहून दोन इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) आणि इतर स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.