मध्य प्रदेशमधील गुना येथे अयान पठान (२४) ने एका २३ वर्षांच्या हिंदू महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये तिच्या डोळ्याची दृष्टी गेली आहे, तर दुसऱ्या डोळ्यात मिरची पावडर टाकल्याने दृष्टी कमी झाली आहे. पोलिसांनी खोलीतून एक बेल्ट आणि फेविक्विक ग्लू ट्यूबही जप्त केली आहे. तिला रुग्णालयात नेण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे.
दरम्यान यातील पीडितेचे आरोपीशी संबंध होते आणि तो तिच्यावर घराचा करारनामा करण्यासाठी दबाव टाकत होता. त्याने तिचा अमानुष छळ केला. या प्रकरणात पोलिसांनी कलम १६४ अन्वये कोर्टात तिचे जबाबही नोंदवले आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना पीडीतेने सांगितले की, आरोपीने तीन ते चार दिवसांपूर्वी तिला बेदम मारहाण केली. याशिवाय तो तिच्यावर नेहमी मारहाण केली. त्याने झाडूच्या हँडलने तिच्या डोळ्यावर प्रहार केला आणि त्याच ठिकाणी दगडाने वार केले. त्याने किमान एक महिना वारंवार तिचा विनयभंग केल्याचे तिने स्पष्ट केले. आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन पिडीत हि पठान याच्यासोबत राहायला गेली. त्याने तिला घराची नोंदणी करण्यासाठी दबाव टाकला. तिने नकार दिल्यानंतर तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवाय, जेव्हा ती ओरडली तेव्हा त्याने फेविक्विक तिच्या तोंडात टाकले.
हेही वाचा..
हैदराबादची ‘मालवाहतूक ट्रेन’ सुसाट; दिल्लीला पराभूत करून दुसऱ्या क्रमांकावर झेप
कर्नाटकमध्ये भाजप नेत्याच्या मुलासह चौघांची हत्या
राजस्थानमध्ये वऱ्हाडांच्या कारला अपघात, ९ जणांचा मृत्यू!
तिला हॉस्पिटलमध्ये नीट खाणं-पिणंही जमत नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दृष्टी पुनर्संचयित करण्याची सध्या १० टक्के शक्यता आहे. या प्रकरणात आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी पीडीतेच्या आईने केली आहे.
बेकायदा बांधकाम पाडले.
दरम्यान, अयान पठाण यांच्यावर आरोप करून एक बेकायदा बांधकाम प्रशासनाने पाडले आहे. गुना येथे बेकायदेशीरपणे बांधलेले घर रविवारी पाडले. अधिकाऱ्यांना आढळले की अयानचे घर सरकारी जमिनीवर बनावट कागदपत्रांचा वापर करून बांधले गेले होते, ते पाडण्यात आले.
अयान पठाण याला १७ एप्रिलच्या रात्री विनापरवाना दारू पुरवत असताना पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध कलम ३७६ (बलात्कार), २९४ (अश्लील भाषा), ३२३ (स्वेच्छेने वेदना होणे) आणि अबकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी नमूद केले की तपास केल्यानंतर ते या प्रकरणात अतिरिक्त आरोप लावू शकतात.