भाजप नेते आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचे शनिवारी(२० एप्रिल) दीर्घ आजाराने निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात सायंकाळी ६.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे १९ एप्रिल रोजी मतदान पार पडले आणि दुसऱ्याच दिवशी कुंवर सर्वेश सिंह यांचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून कुंवर सर्वेश सिंह हे भाजपकडून उभे राहिले होते.कुंवर सर्वेश सिंह हे आपल्या आजारीपणामुळे निवडणूक प्रचारात देखील सहभागी झाले न्हवते.उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रमुख भूपेंद्र चौधरी यांनी कुंवर सिंह यांच्या निधनाची बातमी दिली.ते म्हणाले की, कुंवर सर्वेश सिंह यांचे निधन झाले आहे. त्यांना गळ्याला त्रास होत होता आणि त्याचं ऑपरेशन करण्यात आले होते.१९ एप्रिलला तपासणीसाठी ते एम्समध्ये गेले होते पण २० एप्रिलला कुवर यांचे निधन झाले. कुंवर सिंह ७२ वर्षांचे होते.
हे ही वाचा:
‘आप’चा खोटारडेपणा उघडकीस; उपराज्यपालांचा दावा!
‘रेहान बीफ शॉप जिंदाबाद, कत्तल करत रहा’
भारतीय महिला कुस्तीपटूंची कामगिरी!
गाडी अपघातात पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचा मृत्यू; बहीण जखमी!
कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनाची बातमी समजताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला.ते म्हणाले की, मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि माजी खासदार कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनाने मला धक्का बसला आहे. भाजप परिवाराचे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.
दरम्यान, कुंवर सर्वेश सिंग हे उत्तर प्रदेशातील उद्योगपती आणि पक्षाचे मजबूत नेते होते.खासदार होण्यापूर्वी ते ठाकूरद्वारा विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. सर्वेश कुमार यांचा मुलगा कुंवर सुशांत सिंह हा मुरादाबाद लोकसभेत येणाऱ्या बधापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे.