दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्यावरून आम आदमी पक्षाकडून गोंधळ घातला जात आहे. तुरुंगात केजरीवाल यांना इन्सुलिनचा डोस दिला जात नसल्याचा दावा ‘आप’च्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका असल्याचे म्हटले आहे. मात्र आता त्यावर उपराज्यपाल विनय सक्सेना यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उपराज्यपालांनी जाहीर केलेल्या निवेदनात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. तिहार तुरुंग प्रशासनाने केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत उपराज्यपालांना अहवाल सादर केला आहे. त्यात आपचा खोटारडेपणा उघड झाला आहे. केजरीवाल यांच्या आरोग्याबाबत आम आदमी पक्षाकडून जे काही सांगितले जात आहे, ते तेलंगणमधील खासगी दवाखान्यातून होणाऱ्या उपचारांवर आधारित आहे.
‘अरविंद केजरीवाल इन्सुलिन रिव्हर्सलवर होते आणि डॉक्टरांनी त्यांच्या अटकेच्या कितीतरी दिवस आधी इन्सुलिनचा डोस बंद केला होता,’ असा दावा उपराज्यपालांनी केला आहे. दिल्लीच्या आरोग्य यंत्रणेबाबत ‘आप’कडून केल्या जाणाऱ्या दाव्यांचाही उपराज्यपालांनी समाचार घेतला. तरीही त्यांना (केजरीवाल) दक्षिणेत लपून छपून जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. त्यांचा ते वैद्यकीय अहवालही सादर करू शकलेले नाहीत.उपराज्यपाल विनय सक्सेना यांनी जाहीर केलेले निवेदनात तुरुंग अधीक्षकांनी सादर केलेल्या अहवालाचा आधार घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
भारतीय महिला कुस्तीपटूंची कामगिरी!
गाडी अपघातात पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचा मृत्यू; बहीण जखमी!
ईव्हीएममुळे जिंकलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ म्हणतात, ईव्हीएम शंकास्पद!
लॉरेन्स बिश्नोईच्या माणसाची खोटी माहिती देणाऱ्याला अटक
१. अरविंद केजरीवाल हे तेलंगणस्थित खासगी डॉक्टरकडून उपचार घेत आहेत. त्यांच्या डॉक्टरने इन्सुलिन डोस बंद केला होता. ते अँटी-डायबिटिज टॅब्लेट मेटमॉर्फिनवर होते.
२. तिहार तुरुंगातील वैद्यकीय तपासणीदरम्यान केजरीवाल यांनी डॉक्टरांना सांगितले होते की, ते काही वर्षांपासून इन्सुलिन घेत होते. काही महिन्यांपूर्वी तेलंगणमधील डॉक्टरांनी इन्सुलिन बंद केले होते.
३. आरएमएल रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालानुसार, केजरीवाल यांना इन्सुलिन घेण्याचा सल्ला देण्यात आला नव्हता किंवा इन्सुलीनची आवश्यकताही सांगितली नव्हती. १० आणि १५ एप्रिल रोजी केजरीवाल यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आणि त्यांना डायबेटिजसाठी टॅब्लेट घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे केजरीवाल यांना इन्सुलिन घेण्यापासून रोखण्यात आले, हा आरोप चुकीचा आहे.
४. तज्ज्ञांनी केजरीवाल यांची तपासणी केल्यानंतर हेदेखील सांगितले की, न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतरही केजरीवाल यांच्या रक्तातीत साखरेचे प्रमाण वाढलेले नाही आणि त्यांना इन्सुलीनची सध्या तरी आवश्यकता नाही.
केजरीवाल हे मिठाई, लाडू, केळे, आंबा, तळलेले पदार्थ, भुजिया, गोड चहा, पुरीभाजी, लोणचे असे अधिक कोलेस्टेरोलयुक्त पदार्थही खात होते.