अयान पठाण या २४ वर्षीय तरुणाने एक महिलेवर बलात्कार करून तिचा अनन्वित छळ केल्याची घटना मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात गुरुवारी उघडकीस आली. तसेच, त्याने या महिलेच्या जखमेवर मीठ व मिरचीपूड टाकून तिचा छळ केला.
अयान पठाण हा आरोपी २३ वर्षीय महिलेला त्याच्याशी लग्न करावे, म्हणून जबरदस्ती करत होता, असे पोलिस अधिकारी दिलीप राजोरिया यांनी सांगितले. त्याला या महिलेचे घर हवे होते, असा दावा या महिलेच्या आईने केला आहे.
अयानने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्याला या महिलेची मालमत्ता हवी होती, असे ती सांगत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ‘मी त्याला एक ते दोन महिन्यांपासून ओळखते. तो शेजारी राहात होता. तिथपासून तो माझी मालमत्ता हडपण्यासाठी माझा छळ करत होता, माझ्यावर बलात्कार करत होता. मला वडील नाहीत. मी माझ्या आईसोबत गुना येथे राहाते. तो म्हणायचा की त्याचे माझ्यावर प्रेम आहे. मात्र तो नंतर माझ्या मालमत्तेसाठी माझा छळ करू लागला,’ असे या तरुणीने म्हटले आहे.
आरोपी तिला चामडी पट्ट्याने आणि लोखंडी काठीने मारहाण करत असे. तसेच, तो तिच्या जखमांवर मीठ आणि मिरचीपूड चोळत असे. एकदा दर त्याने तिचे तोंड बंद करण्यासाठी तिच्या तोंडात फेव्हिकॉलही ओतला होता. या मुलीने याबाबत तक्रार केली नव्हती. मात्र तिसऱ्यांदा त्याने अनन्वित अत्याचार केल्याने तिने पोलिसांत धाव घेतली. तिने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
हे ही वाचा:
इराणने जप्त केलेल्या इस्रायली जहाजावरील भारतीय डेक कॅडेट सुखरूप परतली मायदेशी
पक्षांना निधी पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय निधीचा पर्याय
भगवी वस्त्रे परिधान केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हा
लहान मुलांच्या नेस्ले सेरेलॅकवर संशय!
मुलीला केवळ मालमत्तेसाठी प्रेमप्रकरणात अडकवण्यात आले असल्याचा आरोप करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी या तरुणीच्या आईने केली. दिलीप राजोरिया या पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पीडितेने अधिकाऱ्यांना सांगितले की, आरोपीने तिला महिनाभर ओलीस ठेवले आणि वारंवार तिच्यावर बलात्कार केला. मंगळवारी तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पठाणने तिचा पाठलाग करून शिवीगाळ केली. पठाण याला बुधवारी, १७ एप्रिल रात्री बेकायदा दारूचा पुरवठा करताना अटक करण्यात आली. आरोपीवर कलम ३७६ (बलात्कार), २९४ (अश्लील भाषा) आदी कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.